( प्रगत भारत । pragatbharat.com)
Viral Video : सोशल मीडियावर (Social Media) सध्या अंगावर काटा आणणारा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शार्कने (Shark Attack) एका तरुणावर हल्ला करुन त्याला संपवल्याचे दिसत आहे. टायगर शार्कने (Tiger shark) इजिप्तच्या हर्गहाडा (Hurghada) शहराच्या मध्यभागी एका रशियन पर्यटकावर हल्ला केला. या भयानक हल्ल्यामध्ये एका 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. हा सर्व थरार एका व्यक्तीच्या कॅमेरात कैद झाला आहे. समुद्रकिनाऱ्यावर पोहणाऱ्या एका रशियन पर्यटकाला शार्कने जिवंत गिळलं आहे.
या हल्ल्यात आणखी दोन पर्यटक जखमी झाले आहेत. या संपूर्ण घटनेदरम्यान त्या तरुणाच्या वडिलांसह अनेक लोक समुद्रकिनाऱ्यावर होते. इजिप्तच्या पर्यावरण मंत्रालयाने या भयानक घटनेनंतर 74 किमीचा समुद्र किनारा बंद करण्यात करण्याचा निर्णय घेतला आहे. हा तरुण त्याच्या गर्लफ्रेन्डसोबत समुद्रात गेला होता. त्यानंतर शार्कने त्याला खोल पाण्यात ओढले. घटनास्थळी असलेल्या लोकांनी सांगितले की, शार्क जेव्हा तरुणाला पाण्यात ओढत होता तेव्हा तो ‘पप्पा, पप्पा…’ असे ओरडत होता. हल्ल्यानंतर तरुण मदतीची याचना करत होता. मात्र कोणीही मदतीसाठी पुढे येऊ शकले नाही.
या हल्ल्यानंतर सरकारने अल-गौना रिसॉर्ट आणि सोमा बे दरम्यान पोहणे, स्नॉर्कलिंग आणि इतर खेळांवरही पुढील 2 दिवस बंदी घातली आली आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, हल्ल्यानंतर शार्कला पकडून प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे. अधिकाऱ्यांच्या मते, शार्क सहसा समुद्राच्या किनारी भागात हल्ला करत नाहीत.
तरुणावर हल्ला झाल्यानंतर समुद्रकिनारी उभे असलेले लोक हा संपूर्ण प्रकार पाहत होते. स्वत: तरुणाचे वडील आपल्या मुलाच्या मृत्यूचे दृश्य असहाय्यपणे पाहत होते. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये हा तरुण पाण्यात हातपाय मारताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये शार्क देखील दिसत आहे. आधी शार्क त्याच्या भोवती फिरताना दिसते. नंतर त्याला पाण्याखाली खेचून संपवून टाकते.
Shark attack at a beach in Egypt
— Leeroy Johnson (@LeeroyPress) June 8, 2023
दरम्यान, शार्कच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या रशियन पर्यटकाचे नाव व्लादिमीर पोपोव्ह असल्याचे समोर येत आहे. तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने सांगितले की, “आम्ही पोपोव्हची मदत करण्याचा प्रयत्न केला होता. पण हे सगळं काही क्षणात घडले. पाण्यात हालचाल होताच मला शार्क असल्याचा संशय आला होता. इतर लोकांना शार्कबद्दल सावध करण्यासाठी मी ताबडतोब किनाऱ्यावर आलो. बचावकर्त्यांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत शार्कने हल्ला केला होता.”