India fastest growing economy 25 crore people out of poverty in 10 years says Droupadi Murmu

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Budget 2024: देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Minister Nirmala Sitharaman) या उद्या म्हणजे 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यापूर्वी आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला औपचारिकपणे सुरुवात झाली. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांनी संसदेत अर्थसंकल्पासंदर्भात खासदारांना संबोधीत केलं. मागील वर्ष भारतीय अर्थव्यवस्थेसाठी चांगले गेले आहे. भारत सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून उदयास आला असल्याचे राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मू म्हणाल्या.  तसेच गेल्या 10 वर्षात 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढल्याचेही त्या म्हणाल्या. जम्मू-काश्मीरमधील आरक्षणामुळं राज्याच्या विकासाला गती मिळेल, असंही त्यांनी सांगितलं.

कोणताही देश तेव्हाच प्रगती करतो जेव्हा तो तरुणांच्या क्षमतेचा पुरेपूर फायदा घेतो असेही  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या. भारतातील लोकांना राम मंदिर उभारणीची वर्षानुवर्षे अपेक्षा होती आणि आता हे स्वप्न पूर्ण झाले आहे. तसेच जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याबाबत शंका व्यक्त केल्या जात होत्या, मात्र, ते देखील हटवण्याचा निर्णय झाल्याचे राष्ट्रपती म्हणाल्या. संसदेने तिहेरी तलाकविरोधात कायदा केला आहे. याच संसदेने शेजारी देशातून येणाऱ्या अत्याचारित नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्याचा कायदा केला आहे. तसेच सरकारने मिशन मोडवर लाखो नोकऱ्या दिल्या आहेत. वन रँक वन पेन्शनची तरतूद केली आहे. भारतीय लष्करात प्रथमच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफची नियुक्ती करण्यात आल्याचे राष्ट्रपती म्हणाल्या. आमच्या सरकारच्या 10 वर्षांच्या कार्यकाळात 25 कोटी लोक दारिद्र्यरेषेतून बाहेर आले आहेत. 25 कोटी लोकांची गरिबी दूर झाली असून देशातील उर्वरित लोकांसाठी हा आशेचा किरण असल्याचे राष्ट्रपतींनी म्हटले आहे. त्यामुळं सध्या भारत योग्य दिशेने वाटचाल करत आहे. तसेच सरकार योग्य निर्णय घेत असल्यानं आत्मविश्वास वाढत असल्याचे राष्ट्रपती म्हणाल्या. 

भारताची निर्यात वाढली

गेल्या 10 वर्षांत आपण भारताला पहिल्या पाच अर्थव्यवस्थांमध्ये सामील झाला आहे. भारताची निर्यात सुमारे 450 अब्ज डॉलरवरुन 775 बिलियन डॉलरपेक्षा जास्त झाली असल्याचे राष्ट्रपतींनी म्हटलं आहे. एफडीआय पूर्वीच्या तुलनेत दुप्पट झाला आहे, खादी आणि ग्रामोद्योग उत्पादनांची विक्री चार पटीने वाढली असल्याचा उल्लेख देखील राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात केला आहे. 

आयटीआर भरणाऱ्यांची संख्या वाढली

दरम्यान, आयटीआर (Income tax return) भरणाऱ्यांची संख्या 3.15 कोटींवरुन 8.15 कोटी झाली आहे. ही वाढ दुप्पट आहे. दशकभरापूर्वी देशात केवळ काहीसे स्टार्टअप होते. जे आज एक लाखांहून अधिक झाले आहेत. वर्षभरापूर्वी 94 हजार स्टार्टअपची नोंदणी झाली होती. जी गेल्या वर्षी 1.6 लाख झाली आहे. जीएसटी भरणाऱ्यांची संख्या 1.4 कोटींवर पोहोचली आहे.

 10 वर्षात 21 कोटींहून अधिक वाहनांची खरेदी 

गेल्या 10 वर्षात देशातील जनतेने 21 कोटींहून अधिक वाहनांची खरेदी केली आहे. 2014-15 मध्ये 2000 इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली होती, तर 2023-24 मध्ये डिसेंबर महिन्यापर्यंत 15 लाख इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली आहे. गेल्या दशकात सरकारने सुशासन आणि पारदर्शकता हा अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार बनवला आहे. ज्यामुळं भारताने मोठ्या आर्थिक सुधारणा केल्याचे राष्ट्रपती म्हणाल्या. गेल्या 10 वर्षांत वित्तीय तूट नियंत्रणात आहे, तर परकीय चलनसाठा 600 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. भारताची बँकिंग व्यवस्था जगातील सर्वात मजबूत बँकिंग प्रणाली बनली आहे. भारतीय बँकांचा एनपीए पूर्वी दुहेरी अंकात होता, आता तो एक अंकावर आला आहे. भारत आज जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल फोन निर्यातदार देश झाला असल्याचा उल्लेख देखील राष्ट्रपतींनी यावेळी केला. 

महत्त्वाच्या बातम्या:

Budget 2024 : मोठी बातमी! मोबाईल फोन स्वस्त होणार, बजेटपूर्वी केंद्र सरकारकडून मोठा दिलासा; आयात शुल्कात पाच टक्क्यांची घट

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts