Skymet Monsoon Forecast 2023 Monsoon Expected To Arrive Late In Andaman This Year Predicts Skymet Weather

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Skymet Monsoon Forecast 2023 : यंदा मान्सून (Monsoon) अंदमानमध्ये (Andaman) उशिराने दाखल होण्याचा अंदाज आहे. हवामानाची माहिती देणारी स्कायमेट वेदर (Skymet Weather) या खासगी संस्थेने हा अंदाज वर्तवला आहे. मान्सून अंदमानमध्ये साधारणत: 22 मे रोजी दाखल होत असतो. मात्र यंदा त्याची सुरुवात कमकुवत दिसत आहे. त्यामुळे यंदा मान्सून अंदमानमध्ये विलंबाने दाखल होण्याचा अंदाज स्कायमेटच्या शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे. तसंच केरळात नैऋत्य मान्सून साधारणपणे 1 जून रोजी दाखल होत असतो, मात्र नैऋत्य मान्सूनसंदर्भात आताच सांगणं कठिण असल्याचं मत शास्त्रज्ञांनी व्यक्त केलं आहे. 

तर भारतीय हवामान विभागाकडून (IMD) पुढील एक ते दोन दिवसात अंदमानात मान्सून कधीपर्यंत दाखल होईल या संदर्भातली माहिती दिली जाणार आहे.

स्कायमेटकडून यंदाचा मान्सून सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर भारतीय हवामान विभागाकडून यंदाचा मान्सून सर्वसाधारण राहण्याचा अंदाज जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी उत्तरेकडे जूनपर्यंत उष्ण हवामान कायम राहण्याचा अंदाज, त्यामुळे पेरणीला देखील उशील होऊ शकतो. 

वेगारीस आॅफ द वेदरकडून केरळात मान्सून उशिरा दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 4 जूनपर्यंत मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्रात 9 तारखेपर्यंत आणि मुंबईत 15 जूनपर्यंत मान्सूनचे आगमन होणार असल्याचं भाकित वेगारीस ऑफ द वेदरने वर्तवलं आहे. 

news reels Reels

दरम्यान दक्षिण भारतीय महासागर परिसरात एक चक्रीवादळ तयार होत असल्याने बाष्प तिकडे ढकलले जातील. अशात मादागास्कर परिसरात उच्च दाब तयार होण्यास आणखी काही दिवस लागण्याची शक्यता अशात मान्सूनचे ढग तयार होण्यास उशीर होण्याचा अंदाज आहे.

मान्सूनची वाटचाल कशी असते? 

22 मे – अंदमान 

1 जून – केरळ 

7 जून – महाराष्ट्र 

11 जून – मुंबई

VIDEO : Skymate Weather : मान्सूनचं आगमन लांबणीवर जाणार, अंदमानात मान्सून उशिराने दाखल होणार

संबंधित बातमी

Skymet Monsoon Forecast: यंदा देशभरात सरासरीच्या 94 टक्केच पाऊस पडणार; महाराष्ट्रात जुलै-ऑगस्ट महिन्यात कमी पाऊस , स्कायमेटचा अंदाज

 

[ad_2]

Related posts