Thief Regrets Temple Heist After 9 Years Returns All Stolen Jewellery Odisha; मंदिरात चोरी केली, देवाने चांगलीच अद्दल घडवली, ९ वर्षांनी चोरीच्या वस्तू परत केल्या

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

भुवनेश्वर: बऱ्याचदा आपल्या सभोवताली अशा घटना घडतात ज्यावर आपला विश्वासच बसत नाही. आता हेच बघा एका चोराने तब्बल ९ वर्षांनी मंदिरातून चोरलेल्या वस्तू परत केल्या आहेत. देवाला पश्चात्तापाचे पत्र लिहून या चोराने नऊ वर्षांनी मंदिरातून चोरीला गेलेल्या वस्तू परत केल्या आहेत. इतकंच नाही तर त्याने दंड भरला, दक्षिणा देताना माफी मागितली आहे. हे ऐकायला विचित्र वाटत असले तरी हे खरं आहे.ओदिशाची राजधानी भुवनेश्वरच्या गोपीनाथपूर गावातील ही घटना आहे. गावातच गोपीनाथ देवाचे मंदिर आहे. २०१४ मध्ये गोपीनाथ मंदिरातून चोरी झाली होती. या मंदिरातून चांदीचे दागिने चोरीला गेले होते. देवाची चांदीची बासरी, छत्री, मुकुट, चांदीचे डोळे, ताट, घंटा चोरट्याने चोरून नेल्या होत्या. त्यावेळी ग्रामस्थांनी लिंगराज पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

लव्ह मॅरेजनंतर पतीचा हार्ट अटॅकने अंत, अंत्यसंस्काराची तयारी सुरु असतानाच पत्नीचं टोकाचं पाऊल
चोराने देवाची माफी मागितली, दागिने परत केले

त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. मात्र, चोरीचा माल कुठेही सापडला नाही. या घटनेला नऊ वर्ष झाले. आता या चोरट्यानेच देवाच्या मंदिरातून चोरलेल्या सर्व वस्तू परत केल्या आहेत. स्वत:लाच त्याने शिक्षाही केली. त्याने १०१ रुपयांचा दंडही भरला, तर २०१ रुपयांची दक्षिणाही दिली आहे.

एवढेच नाही तर चोरीचा माल परत करण्याच्या ठिकाणी त्याने एक चिठ्ठीही सोडली. त्यात त्यांने देवाचे दागिने चोरल्यानंतर त्याला आलेल्या अडचणींबाबत त्याने या चिठ्ठीत लिहिले. दागिने चोरल्यानंतर त्याला आयुष्यात अनेक समस्यांना तोंड द्यावं लागल्याचं त्यानं सांगितलं.

मास्टरमाइंड पोलीस; गुन्हेगारांचा अचूक छडा लावणारे अजय जाधव यांचा सन्मान होणार

नऊ वर्षात अनेक समस्यांना तोंड दिलं

या नऊ वर्षांत मी अनेक समस्यांचा सामना केला आहे. म्हणूनच मी देवाला दागिने परत करण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे, नऊ वर्षांनंतर दागिने परत मिळाल्याने गावात आनंदाची लाट उसळली आहे. मात्र, चोरट्याची ओळख अद्याप पटलेली नाही.

तर, स्थानिकांनी सांगितलं की आम्ही दागिने परत मिळण्याची आशाच सोडली होती. त्यामुळे हे कुठल्या चमत्कारापेक्षा कमी नाही. एका यज्ञादरम्यान चोराने परमेश्वराचे दागिने चोरले होते, त्या वेळी पुजारी जवळच्या मंदिरात गेले होते. मंदिराचे पुजारी कैलाश पांडा यांनी सांगितले की चोराने एक पत्र मागे सोडले आहे. ज्यात दावा केला आहे की या गुन्ह्यासाठी देवाकडून त्याला शिक्षा मिळाली. त्याने काही दक्षिणा आणि दंडही भरला आहे.

Crime News: पत्नी, काकू, वहिनी आणि माहेरी आलेल्या बहिणीला संपवलं, घटनेने सारं गाव दहशतीत

[ad_2]

Related posts