Paytm Bank how did Paytm problems increase Why did RBI take action money launding case Know in detail marathi 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : पेटीएम पेमेंट बॅंकेवर (Paytm Bank) आरबीआयकडून बॅंकिंग रेग्युलेशन ॲक्ट 35 अ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. आरबीआयकडून पेटीएम पेमेंट बॅंकेला 29 फेब्रुवारीपासून कोणत्याही ठेवी स्वीकारण्यास बंदी घालण्यात आली आहे. पेटीएम बँकेने बॅंकिंग नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. 

आरबीआयनं पेटीएम बँकेच्या केलेल्या ऑडिटमध्ये एकाच पॅनकार्डवर अनेक अकाऊंट्स आढळले ज्यांचे व्यवहार संशयास्पद होते. सोबतच अनेक अकाऊंट्समध्ये केवायसी संदर्भात देखील त्रुटी आढळण्याचं कळतं. प्रमोटर कंपनी असलेल्या पेटीएमसोबत अंतर राखून व्यवहार करणं आवश्यक असताना थेट व्यवहार झालेत, ज्यात आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचं दिसून आलं. 

अनेक व्यवहार संशयास्पद 

पेटीएम पेमेंट बॅंक वन 97 कम्युनिकेशनच्या आयटी पायाभूत सुविधांवर अवलंबत्व अधिक असल्याचं आढळलं. ज्यात अनेक व्यवहार पॅरन्ट कंपनीच्या ॲप्सद्वारे झालेत. पेटीएम पेमेंट बॅंकेकडून आरबीआयच्या नियमांचे पालन करण्यास तातडीनं पावलं टाकण्यास सुरुवात केल्याचं सांगितलं. सोबतच, पेटीएमच्या सुविधांसाठी पेटीएम पेमेंट बॅंकेऐवजी दुसऱ्या बॅंकेद्वारे व्यवहार होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं. 

मनी लाँड्रिंग झालं असेल तर चौकशी केली जाईल 

1 फेब्रुवारी रोजी शेअर बाजारात पेटीएमचे समभाग 20 टक्क्यांनी कोसळले आणि लोअर सर्किट संपूर्ण दिवस कायम राहिलं. पेटीएमसंदर्भात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून आरबीआय आपलं काम करत असल्याचं स्पष्ट करण्यात आलं.  समग्रपणे आम्ही फिनटेक क्षेत्राला महत्त्व देत असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. मनी लॉंड्रिंग झालं असल्यास याप्रकरणी चौकशी केली जाईल असं अर्थ सचिव संजय मल्होत्रा यांच्याकडून सांगण्यात आलं. 

अशातच, सलग दुसऱ्या दिवशी देखील पेटीएमच्या शेअर्समध्ये घसरण होत लोअर सर्किट लागल्याने गुंतवणूकदारांची चिंता वाढली. गुंतवणुकदारांचे नुकसान कमी होण्यासाठी स्टाॅक एक्सचेंजकडून पेटीएमची लिमिट 20 टक्क्यांवरून 10 टक्के करण्यात आली. 

पेटीएमकडून खुलासा

पेटीएमकडून आपल्या कर्मचाऱ्यांमधली धास्ती कमी करण्यासाठी एका बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. पेटीएमची पॅरन्ट कंपनी वन 97 कम्युनिकेशनकडून माध्यमांमध्ये ईडी चौकशी संदर्भातल्या बातम्यांसंदर्भात खुलासा करण्यात आला.  कंपनी किंवा संस्थापक, सीईओ यांची ईडीकडून मनी लाँड्रिंग संदर्भात चौकशी केली जात नसल्याचं सांगितलं गेलं. पेटीएम बँक भारतीय कायद्यांचे कंपनी पालन करत आहे आणि नियमकाचे आदेश गांभीर्याने घेत असल्याचं कंपनीकडून बैठकीत स्पष्ट करण्यात आलं. 

सोमवारी, तरीही पेटीएमचे समभाग 10 टक्क्यांनी कोसळले आणि लोअर सर्किट लागलं. मागील 3 सेशन्समध्ये पेटीएमच्या समभाग 42 टक्क्यांची घसरण दिसली. पेटीएमची मागील तीन सेशन्समध्ये 20 हजार कोटींनी मार्केट कॅप घटली आहे. आरबीआयकडून बॅंकेवर परवाना रद्द करण्याची तांगती तलवार लटकली असून येत्या काही दिवसात त्याबद्दलची स्थिती स्पष्ट होईल. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts