delhi aap ed raid senior leaders houses ed searches against arvind kejriwal personal secretary as part of money laundering probe marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Arvind Kejriwal News Update : अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. केजरीवाल यांचा पीएस वैभव आणि खासदार एनडी गुप्ता यांच्यासह अनेक आप नेत्यांच्या घरांवर ईडीने छापेमारी केल्याची माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीकडून आप नेत्यांच्या घरावर छापेमारी करण्यात येत असल्याची माहिती आहे. दिल्लीतील आम आदमी पार्टीच्या बड्या नेत्यांच्या घरांवर ईडीने छापे टाकले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अरविंद केजरीवाल यांचे पीएस वैभव आणि खासदार एनडी गुप्ता यांच्या घरांवर छापे टाकण्यात आले आहेत.

केजरीवालांच्या निकटवर्तीयांवर ईडीची छापेमारी

मनी लाँड्रिंगप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाची (ED) सातत्याने कारवाई करत आहे. मंगळवारी, ईडीने आर्थिक गैरव्यावहार प्रकरणी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टीशी संबंधित इतरावर कारवाई करत छापेमारी केली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.

दिल्लीत सुमारे 10 ठिकाणी छापे

आर्थिक गैरव्यावहार प्रकरणी ईडीची कारवाई

आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ED ॲक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळतंय. एएनआय वृत्तसंस्थेने ट्वीट करत दिलेल्या माहितीनुसार, आपचे खासदार एनडी गुप्ता यांच्या दिल्लीतील घरावर ईडीचा छापेमारी सुरु आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ईडी मनी लाँड्रिंगच्या चौकशीचा एक भाग म्हणून आम आदमी पार्टीशी संबंधित असलेल्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या वैयक्तिक सचिवांच्या निवासस्थानासह सुमारे 10 ठिकाणी छापेमारी करत शोध घेत आहे.

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts