murder in gurdwara premises in patiala, गुरुद्वाराच्या आवारात मद्यपान केल्याच्या रागातून तरुणीची हत्या; पतियाळा येथील घटना – young woman murder for drinking in gurdwara premises in patiala

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

वृत्तसंस्था, पतियाळा : दारूच्या व्यसनावर उपचार सुरू असलेल्या तरुणीने गुरुद्वाराच्या आवारात मद्यप्राशन केल्याने तिची गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून, तिच्या कृत्याने धार्मिक भावना दुखावल्यामुळे रागाच्या भरात हे पाऊल उचलल्याची कबुली आरोपीने दिली आहे.अशी आहे घटना

‘दुखनिवारण साहिब’ गुरुद्वाराच्या आवारातील सरोवराच्या (पवित्र कुंड) बाजूला परविंदर कौर ही तिशीतील तरुणी मद्यप्राशन करत होती. गुरुद्वारात नियमितपणे येणाऱ्या निर्मलजितसिंग सैनीने हे दृश्य पाहून परविंदरवर स्वत:च्या परवानाधारक पिस्तुलाने गोळ्या झाडल्या, अशी माहिती पतियाळाचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक वरुण शर्मा यांनी दिली. सैनी याचा मालमत्ता खरेदी-विक्रीचा व्यवसाय असून त्याची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे गुरुद्वाराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यात आल्यानंतर त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

‘परविंदर कौर सरोवराजवळ बसून मद्यप्राशन करत असल्याचे गुरुद्वारामधील कार्यकर्त्यांनी पाहिले. तेव्हा त्यांनी तिला व्यवस्थापकाच्या कार्यालयात नेले. या कार्यालयातून परविंदर पोलिसांच्या सोबत बाहेर पडत असताना सैनी याने तिच्यावर गोळ्या झाडल्या’, अशी माहिती शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीच्या अधिकाऱ्यांनी दिली. गोळीबार केल्यानंतर सैनी स्वत:हून पोलिसांना शरण आला आणि त्याने त्याचे शस्त्रही त्यांच्याकडे सुपूर्द केले. सैनी याने परविंदरवर पाच गोळ्या झाडल्या. यातील तीन गोळ्या लागून तिचा जागीच मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले. या गोळीबारात आणखी एक जण जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती स्थिर आहे. प्राथमिक तपासात, परविंदर हिच्याकडे व्यसनमुक्ती केंद्राने दिलेले औषधांचे प्रिस्क्रिप्शन सापडले आहे. यात तिला मानसिक ताण असल्याचे डॉक्टरांनी नमूद केले आहे.

Akola Crime: पतीच्या डोक्यात शिरलं भलंतच खूळ, पत्नीसाठी अख्खं गाव हादरवलं; आधी गोळीबार केला नंतर…
मारेकऱ्यावर फुलांचा वर्षाव

सैनी याला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर तो न्यायालयाच्या बाहेर येत असताना शीख समुदायातील काही व्यक्तींनी त्याचे अभिनंदन करून त्याच्यावर फुलांचा वर्षाव केला.

[ad_2]

Related posts