Increase the price of rice, the government introduced Bharat Rice in the market to reduce the price 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Bharat Rice: तांदळाच्या दरात (Rice Price) वाढ होत आहे. वाढत्या किंमती कमी करण्यासाठी सरकार सातत्यानं प्रतत्न करत आहे. कारण, सरकारला महागाई नियंत्रणात ठेवायची आहे. सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी सरकार विविध उपाययोजना करत आहे. दरम्यान, वाढत्या तांदळाच्या किंमती कमी करण्यासाठी सरकार आता सर्वसामान्यांना 29 रुपये प्रति किलो दराने तांदळाची विक्री करणार आहे. त्यासाठी सरकारनं भारत राईस (Bharat Rice) नावानं नवीन ब्रँड बाजारात आणला आहे. यामुळं सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे. 

5 किलो आणि 10 किलोच्या पॅकमध्ये तांदूळ पॅक

वाढते अन्नधान्याचे दर कमी करण्यासाठी सरकार उपाययोजना करत आहे. अन्नधान्याच्या महागाईत तीव्र वाढ झाल्यानंतर, सरकारनं आधीच भारत ब्रँड नावाने डाळी आणि पीठ बाजारात आणले आहे. अशातच आता भारत राईस नावाने सरकारनं तांदूळ बाजारत आणला आहे. 29 रुपये प्रति किलो दराने तांदळाची विक्री केली जात आहे. दरम्यान, मोदी सरकारनं भारतात 5 किलो आणि 10 किलोच्या पॅकमध्ये तांदूळ पॅक केला आहे. 

तांदळाच्या किंमतीत 15 टक्क्यांनी वाढ

दरम्यान, किरकोळ बाजारात तांदळाच्या किंमतीत वाढ झाल्यानं लोकसभा निवडणुकीपूर्वी सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी सरकारनं भारत डाळ आणि भारत आटानंतर भारत तांदूळ बाजारात आणला आहे. गेल्या वर्षभरात तांदळाच्या किंमती 15 टक्क्यांनी वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत तांदळाच्या भाववाढीपासून दिलासा देण्यासाठी सरकारने किरकोळ बाजारात 29 रुपये प्रति किलो सवलतीच्या दराने भारत तांदूळ बाजारात आणला आहे.

 परवडणाऱ्या किंमतीत अन्नधान्य उपलब्ध करुन देण्यासाठी सरकार प्रयत्नशील :   पियुष गोयल 

दैनंदिन खाद्यपदार्थ सर्वसामान्यांना परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध व्हावेत यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याची माहिती वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी दिली. किंमतीवर नियंत्रण ठेवण्याच्या सरकारच्या प्रयत्नांचा लोकांना फायदा होऊ शकला नाही, म्हणून सरकारनं किंमत स्थिरता निधी अंतर्गत किरकोळ हस्तक्षेप सुरु केला आहे. किरकोळ हस्तक्षेपाचा एक भाग म्हणून, मध्यमवर्गीय ग्राहक आणि गरिबांना दिलासा देण्यासाठी भारत ब्रँड अंतर्गत तांदूळ 29 रुपये प्रति किलो दराने विकला जाईल असे गोयल म्हणाले.

मंत्री गोयल यांनी दाखवला 100 मोबाईल व्हॅनला हिरवा झेंडा 

मंत्री पियुष गोयल यांनी 100 मोबाईल व्हॅनला हिरवा झेंडा दाखवला. ज्या माध्यमातून ‘भारत तांदूळ’ विकला जाणार आहे. तसेच पाच लाभार्थ्यांना पाच किलो पॅकचे वाटपही मंत्री गोयल यांच्या हस्ते करण्यात आले. पहिल्या टप्प्यात, एफसीआय नाफेड आणि एनसीसीएफसह केंद्रीय राखीव निधीसाठी पाच लाख टन तांदूळ प्रदान करण्यात येणार आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या माध्यमातूनही तांदूळ विकला जाईल.

चणा डाळ 60 रुपये किलो दरानं उपलब्ध

अन्नधान्याच्या महागाईत मोठी वाढ झाल्यानंतर सरकारनं भारत ब्रँडच्या नावाखाली डाळी आणि पीठ बाजारात आणले आहे. डाळींच्या महागाईपासून दिलासा देण्यासाठी किरकोळ बाजारात भारत ब्रँडच्या नावाखाली चणा डाळ 60 रुपये किलो दराने विकली जात आहे. गव्हाचे भाव वाढलेले असताना सर्वसामान्यांना स्वस्त दरात पीठ मिळावे म्हणून सरकार 27.50 रुपये किलोने पीठ विकत आहे. आता सरकारने भारत राईस लाँच केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

 शेतकऱ्यांकडून 600 लाख टनांहून अधिक तांदळाची खरेदी, दर कमी करण्यासाठी सरकार उचलणार हे पाऊल

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts