congress leader Rahul Gandhi not to contest Lok Sabha from Amethi Sonia Gandhi also proposed to contest from Telangana marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Rahul Gandhi : देशाच्या राजकारणातली या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. कॉंग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यावेळी अमेठीतून (Amethi) लोकसभा निवडणूक न लढण्याची शक्यता आहे. तर, कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधींनाही (Sonia Gandhi) तेलंगणातून निवडणूक लढण्याचा प्रस्ताव आला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी (Revanth Reddy) यांनी सोनिया गांधी यांना विनंती केल्याची या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे. 

राहुल गांधी अमेठीतून निवडणूक लढणार नाहीत – सूत्र 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनीसुद्धा काल (6 फेब्रुवारी रोजी) सोनिया गांधी यांची या संदर्भात भेटही घेतल्याचं पुढे आलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गांधी हे अमेठीतून निवडणूक लढणार नाहीत. मागच्या वेळेस ते निवडणूक लढले होते. मात्र, त्यांना पराभूत व्हावं लागलं होतं. तसेच, सोनिया गांधीसुद्धा तेलंगणातून निवडणूक लढणार आहेत अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. तसेच, राहुल गांधींच्यासुद्धा दोन्ही जागा या दक्षिण भारतातल्याच असतील असंही सांगण्यात आलं आहे. 

स्मृती इराणींकडून पराभव पत्कारावा लागला होता 

गेल्या वेळी कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याकडून पराभव पत्कारावा लागला होता. त्यांच्या पराभवामुळे कॉंग्रेस पक्षाचं एक प्रकारे मनोधैर्य खच्चं झालं होतं. त्यामुळे राहुल गांधी यावेळी अमेठीतून निवडणूक लढणार नाहीत अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

खरंतर, अमेठी हा गांधी परिवाराचा परंपरागत मतदारसंघ म्हणून ओळखला जात होता. त्या ठिकाणी स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांना मात दिली होती. त्यांचा पराभव केला होता. त्यामुळे यावेळी राहुल गांधी कोणता मतदारसंघ निवडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

महत्त्वाच्या बातम्या :

Rohit Pawar : पक्ष, चिन्ह कोणालाही मिळू दे पण ज्या बापाने ती पार्टी सुरु केली असा बापमाणूस आमच्याबरोबर : रोहित पवार

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts