Paytm Crisis 11 lakh investors 97 mutual companies money in danger business marathi news 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई: देशातील सर्वात मोठ्या डिजिटल प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या पेटीएमवरील संकटाचे ढग (Paytm Crisis) अद्याप दूर झालेले नाहीत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये 9 टक्क्यांनी वाढ झाल्याचं दिसून आलं. परंतु पेटीएमबाबत  (Paytm Payments Bank)  नियामक आरबीआयकडून कोणतेही समाधानकारक उत्तर आलेले नाही. अशा परिस्थितीत पेटीएम बुडल्यास त्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या 11 लाख लोकांच्या पैशाचं काय होणार हे पाहावं लागेल. 

पेटीएमचा आयपीओ आला तेव्हा तो देशातील सर्वात मोठा आयपीओ होता. त्यावेळी मोठ्या प्रमाणात किरकोळ गुंतवणूकदारांनी त्यात पैसे गुंतवले होते. कंपनीच्या कामगिरीत सुधारणा झाल्यानंतर मोठ्या संख्येने FII आणि म्युच्युअल फंड योजनांनी पेटीएममध्ये पैसे गुंतवले आहेत.

11 लाख गुंतवणूकदारांचे काय होणार?

सुमारे 11 लाख रिटेल इन्व्हेस्टर्सनी पेटीएम शेअर्समध्ये गुंतवणूक केली आहे. रिटेल इन्व्हेस्टर्स म्हणजे किरकोळ गुंतवणूकदार म्हणजे असे लोक ज्यांची कोणत्याही समभागातील गुंतवणूक 2 लाख रुपयांपेक्षा कमी आहे. पेटीएमचे हे गुंतवणूकदार आयपीओच्या घसरलेल्या किमतीचा फटका सहन करत आहेत. त्यात आता जर पेटीएम बुडाली तर या लोकांना सर्वात मोठा तोटा सहन करावा लागेल.

पेटीएममध्ये गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये केवळ किरकोळ गुंतवणूकदारच नाहीत तर 514 एफआयआय म्हणजे परकीय संस्थात्मक गुंतवणूकदार आणि 97 म्युच्युअल फंड योजनांनीही गुंतवणूक केली आहे. अशाप्रकारे पाहिल्यास पेटीएम बुडल्यास बाजारपेठेत भयंकर गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. या 97 म्युच्युअल फंड कंपन्यांमध्ये फक्त सामान्य माणसाचे पैसे गुंतवले जातात.

या बड्या गुंतवणूकदारांचा पैसाही गुंतलेला आहे

अँटफिन (नेदरलँड) होल्डिंग्स, चीनच्या अँट ग्रुपची उपकंपनी, पेटीएममध्ये 9.89 टक्के हिस्सेदारी आहे. याशिवाय मॉरिशसच्या सेफी ली मॉरिशस कंपनी लिमिटेडचे ​​10.83 टक्के, रेझिलिएंट ॲसेट मॅनेजमेंटचे 10.29 टक्के, SVF इंडिया होल्डिंग्स (केमन) 6.46 टक्के, सैफ पार्टनर्स इंडियाचे 4.60 टक्के शेअर्स एफडीआय म्हणून गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांमध्ये आहेत. . FPI म्हणून कॅनडा पेन्शन प्लॅन इन्व्हेस्टमेंट गार्डने 1.77 टक्के हिस्सा घेतला, तर BNPने देखील पेटीएममध्ये 1.33 टक्के हिस्सा घेतला आहे. 

आरबीआयची कारवाई

आरबीआयनं पेटीएम बँकेच्या केलेल्या ऑडिटमध्ये एकाच पॅनकार्डवर अनेक अकाऊंट्स आढळले ज्यांचे व्यवहार संशयास्पद होते. सोबतच अनेक अकाऊंट्समध्ये केवायसी संदर्भात देखील त्रुटी आढळण्याचं कळतं. प्रमोटर कंपनी असलेल्या पेटीएमसोबत अंतर राखून व्यवहार करणं आवश्यक असताना थेट व्यवहार झालेत, ज्यात आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचं दिसून आलं. 

ही बातमी वाचा: 

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts