entertainment model poonam pandey likely to face of government cervical cancel awarness capaigne

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Poonam Pandey Cervical Cancer Compaign : अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे (Poonam Pandey) सरकारच्या सर्वायकल कॅन्सर मोहिमेचा चेहरा बनू शकते. गेल्या काही दिवसांपासून पूनम पांडे मृत्यूचा बनाव केल्यामुळे चर्चेत आहे. पीटीआयने दिलेल्या बातमीनुसार पूनम पांडे आणि तिच्या टीमचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाशी (Union Health Ministry) बातचीत सुरु आहे. पूनम पांडे केंद्र सरकारच्या सर्वायकल कॅन्सरच्या (Cervical Cancer) अभियानाची ब्रँड अँम्बेसेडर बनू शकते. 

पूनम पांडेच्या निधनाची बातमी
फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला पूनम पांडेच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन तिच्या पीआर टीमने पूनमच्या निधनाची पोस्ट शेअर केली आणि सर्वत्र एकच खळबळ उडाली. पोस्टमध्ये सर्वायकल कॅन्सरमुळे पूनम पांडेचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं. पूनम पांडेच्या  मृत्यूच्या बातमीने सर्वच हैराण झाले. पण दुसऱ्याच दिवशी ही बातमी खोटी असल्याचं समोर आलं. सर्वायकल कॅन्सरविषयी जनजागृती करण्यासाठी पूनम पांडेने हा सर्व स्टंट केला होता. 

3 फेब्रुवारीला पूनम पांडेने एक व्हिडिओ शेअर करत आपण जिवंत असल्याची माहिती दिली. यात तीने सांगितलं ‘निधनाची खोटी बातमी पसरवल्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते. तुम्हा सर्वांसोबत मला एक महत्वाची बातमी शेअर करायची आहे. मी जिवंत आहे. सर्वायकल कॅन्सरमुळे माझा मृत्यू झालेला नाही. पण या आजाराने हजारो महिलांचा मृत्यू झालाय. सर्वायकल कॅन्सरचा सामना करण्याविषयी माहितीचा अभाव याला कारणीभूत आहे, असं तीने म्हटलंय. 

जनजागृतीसाठी निधनाचं नाटक
इतर कॅन्सरच्या तुलनेत सर्वायक कॅन्सरचं वेळीच निदान झालं तर ते रोखू शकतो. यावर एचपीवी वॅक्सीन आणि काही टेस्ट उपलब्ध आहेत. वेळीच यावर योग्य उपचार केले तर सर्वायकल कॅन्सरमधून बरं होता येतं. केवळ याविषयी जनजागृती करण्यासाठी आपण मृत्यूचं नाटक केल्यांच पूनम पांडेने स्पष्ट केलं. 

सर्वायकल कॅन्सर म्हणजे काय?
सर्वायकल कॅन्सर हा (Cervical Cancer) स्त्रियांमधील सर्वात गंभीर कॅन्सरपैकी एक आहे. ब्रेस्ट कॅन्सरनंतर (breast cancer) भारतात महिलांना या आजाराचा सर्वाधिक त्रास आहे. स्त्रियांचं गर्भाशय आणि योनीला जोडणाऱ्या भागाला ग्रीवा म्हणतात. या भागात होणाऱ्या कॅन्सरला सर्वायकल कॅन्सर असं म्हणतात. अनेकदा 35 ते 40 व्या वर्षानंतर महिलांची मासिक पाळी अनियमित होऊ लागते. काहीवेळा मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागतो. वयोमानानुसार हा प्रकार होत असल्याचं अनेक स्त्रिया समज करुन घेतात. पण ही सर्वायकल कॅन्सरची सुरुवात होऊ शकते. 

सर्वायकल कॅन्सर शरीरात यकृत, ब्लॅडर,  योनी, फुफ्फुस आणि मूत्रपिंडात पसरू शकतो. त्यामुळे वेळीच या कॅन्सरची लक्षणे ओळखून त्यावर योग्य उपचार करणे अत्यंत गरजेचं आहे. मात्र या आजाराबाबत लोकांमध्ये अजूनही जागरुकतेचा अभाव आहे.

Related posts