Ratan Tata built a hospital for animals by spending 165 crore rupees in mumbai tata group

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Ratan Tata: देशातील बड्या उद्योगपतींपैकी एक नाव म्हणजे रतन टाटा (Ratan Tata) . टाटा समूह सातत्याने समाज कल्याणासाठी विविध योजना राबवत असते. टाटा ट्रस्टच्या माध्यमातून विविध समाजउपयोगी कामं केली जातात. असंच एक समाजउपयोगी काम रतन टाटा यांनी केलं आहे. रतन टाटा यांनी 165 कोटी रुपये खर्च करून प्राण्यांसाठी रुग्णालय (Animal Hospital) बांधलं आहे. हे रुग्णालय रतन टाटांना नेमकं का बांधावे असं वाटलं? यामगची नेमकी स्टोरी काय? पाहुयात सविस्तर माहिती. 

2.2 एकर जागेवर 24 तास चालणारे प्राणी रुग्णालय 

देशातील लोकप्रिय उद्योगपती रतन टाटा यांनी त्यांचा आणखी एक आवडता प्रकल्प पूर्ण केला आहे. टाटा समूह सातत्याने समाज कल्याणासाठी विविध योजना राबवत असतो. त्यांच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलने कोट्यवधी लोकांना अत्यंत कमी खर्चात कर्करोगाशी लढण्यास मदत केली आहे. त्याच धर्तीवर आता रतन टाटा 165 कोटी रुपये खर्च करून 2.2 एकर जागेवर 24 तास चालणारे प्राणी रुग्णालय सुरू करणार आहेत. मुंबईत तयार झालेले हे हॉस्पिटल सर्वांच्या मदतीसाठी मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून सुरु होणार आहे.

कुत्रा, मांजर, ससा अशा लहान प्राण्यांसाठी रुग्णालय

86 वर्षांचे रतन टाटा अनेक प्रकारच्या देणग्यांसाठी ओळखले जातात. टाटा ट्रस्टचे स्मॉल ॲनिमल हॉस्पिटल महालक्ष्मी परिसरात सुरू होणार आहे. कुत्रा, मांजर, ससा यासारख्या लहान प्राण्यांची सेवा करण्यासाठी हे डिझाइन केले आहे. प्राणी देखील कुटुंबाचा भाग असल्याचे मत रतन टाटा यांनी व्यक्त केले. माझ्याकडे अनेक पाळीव प्राणी देखील आहेत. त्यामुळं मला या रुग्णालयाची नितांत गरज भासली. आता माझे स्वप्न पूर्ण होताना पाहून मला खूप आनंद होत असल्याचे रतन टाटा म्हणाले. 

माझ्या कुत्र्यावर अमेरिकेत उपचार करावे लागले

दरम्यान, रतन टाटांनी त्यांच्यासोबत घडलेला एक प्रसंग देखील सांगितला आहे. रतन टाटांचा कुत्रा आजारी पडला होता. यावेळी ज्वॉइंट रिप्लेसमेंटसाठी रतन टाटा यांच्या कुत्र्यावर अमेरिकेतील मिनेसोटा विद्यापीठात उपचार करावे लागले होते. अमेरिकेती डॉक्टरांनी रतन टाटा यांच्या लाडक्या पाळीव प्राण्यावर शस्त्रक्रिया केली होती. त्यानंतर मुंबईतही जागतिक दर्जाचे पशु रुग्णालय असावे, असा विचार त्यांच्या मनात आला होता. आता त्या रुग्णालयाचे काम पूर्ण होत असून, रतन टाटांचे आणखी एक स्वप्न पूर्ण झालं आहे. 

टाटा समूहाने निर्माण केलेल्या प्रसिद्ध संस्था 

टाटा समूहाच्या सर्वोत्तम संस्थांमध्ये या रुग्णालयाची गणना केली जाईल. याआधी या व्यावसायिक घराने देशातील पहिले कॅन्सर केअर हॉस्पिटल, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस – बंगळुरु सारख्या नामांकित संस्था देखील सुरू केल्या आहेत. हे रुग्णालय सुरुवातीला नवी मुंबईतील कळंबोली भागात बांधले जाणार होते. मग प्रवासात लागणारा वेळ लक्षात घेऊन मुंबईतच करायचं ठरवलं. 

5 नामांकित ब्रिटीश रुग्णालयांशी टाय अप 

या रुग्णालयाची जबाबदारी ब्रिटनचे प्रसिद्ध पशुवैद्य डॉक्टर थॉमस हिथकोट यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. या रुग्णालयाने रॉयल व्हेटर्नरी कॉलेज, लंडनसह 5 प्रसिद्ध ब्रिटिश रुग्णालयांशीही करार केला आहे. भटक्या कुत्र्यांच्या संगोपनासाठी एक स्वयंसेवी संस्थाही उघडण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या:

एकेकाळी रतन टाटा विकणार होते ‘ही’ कंपनी, आज ही कंपनी करतेय 2.41 लाख कोटींची उलाढाल

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts