morning headlines breaking national state news live headlines bulletin morning 10th February 2024 india maharashtra latest update marathi news( प्रगत भारत । pragatbharat.com)

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील…

Pakistan Election : पाकिस्तान निवडणुकीच्या निकालाचे चित्र स्पष्ट व्हायला सुरूवात, इम्रान खान यांचा विजयाचा दावा, व्हिडीओ केला जारी

Pakistan Election : पाकिस्तान निवडणुकीच्या निकालाचे चित्र हळूहळू स्पष्ट व्हायला सुरूवात झाली आहे, या निकालाची अद्यापही मतमोजणी सुरूच आहे. मतमोजणीसाठी देखील बराच विलंब होताना दिसत आहे. अशात, माजी पंतप्रधान तसेच ‘पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ’चे (PTI) इम्रान खान (Imran Khan) यांनी विजयाचा दावा केला आहे. इम्रान खान यांनी आपल्या एका भाषणाचा व्हिडीओ जारी केला आहे. हा व्हिडीओ AI आधारित आवाजासह रेकॉर्ड करण्याच आल्याचे समजते. इम्रान खानचा हा व्हिडिओ अशा वेळी समोर आला आहे, जेव्हा त्यांच्या पक्षाला पाठिंबा देणारे अपक्ष उमेदवार पाकिस्तान निवडणुकीत जागांच्या संख्येच्या बाबतीत आघाडीवर आहेत… वाचा सविस्तर 

Gashmeer Mahajani On Ravindra Mahajani : कधी दार बडवलं जायचं, तर कधी आई, एवढाच काय तो फरक; गश्मीर महाजनीने सांगितल्या हृदयद्रावक आठवणी

Gashmeer Mahajani On Ravindra Mahajani : मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते  रविंद्र महाजनी (Ravindra Mahajani) यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी माधवी महाजन (Madhavi Mahajani) यांनी आपले आत्मचरित्र  लिहिले असून त्याचे प्रकाशन झाले आहे. या आत्मचरित्रात रविंद्र महाजनी यांचा मुलगा आणि अभिनेता गश्मीर महाजनी (Gashmeer Mahajani) याने वडिलांबाबतच्या हृदयद्रावक आठवणी सांगितल्या आहेत. वडील रविंद्र महाजनी यांच्याकडून आईला मारहाण होत असल्याचे त्याने म्हटले. घरी कधी दार बडवलं जायचं, तर कधी आई एवढाच काय तो फरक असल्याचे गश्मीरने म्हटले. वाचा सविस्तर 

शेतकऱ्यांना मिळणार मोफत वीज, तर शेतमजुरांना मिळणार 10000 रुपये, ‘या’ राज्य सरकारची मोठी घोषणा

Farmers News: छत्तीसगड सरकारने (Chhattisgarh Govt) शेतकऱ्यांसाठी (Farmers) मोठा निर्णय घेतला आहे. सरकारनं कृषी बजेटमध्ये (Agriculture Budget) 33 टक्क्यांची वाढ केली आहे. सरकारने शेतीसाठी एकूण 13,438 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. दरम्यान, बजेटमध्ये छत्तीसगड सरकारनं दोन महत्वाचे निर्णय घेतले आहेत. आता सरकार शेतकऱ्यांना मोफत वीज देणार आहे. तसेच शेतमजुरांना 10000 रुपये देणार असल्याची घोषणा बजेटमध्ये केली आहे. वाचा सविस्तर 

India vs Australia: रोहित-विराट का, शामी का, सबका बदला लेगा हमारा उदय सहारन; 84 दिवसांनी टीम इंडिया जिंकणार वर्ल्डकप?

India vs Australia Final U19 World Cup 2024: ICC अंडर-19 विश्वचषक 2024 (U19 World Cup 2024) च्या अंतिम फेरीत भारतीय क्रिकेट संघाचा (India National Cricket Team) सामना ऑस्ट्रेलियाशी (Australia) होणार आहे. दोन्ही संघांमधील हा अंतिम सामना रविवारी (11 फेब्रुवारी) बेनोनी येथील विल्मूर पार्क येथे खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियानं पहिल्या सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) 2 विकेट्सनी पराभव केला आणि थाटात विश्वचषकाच्या फायनलमध्ये प्रवेश केला. तर दुसऱ्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानचा 1 गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला… वाचा सविस्तर 

Pathum Nissanka Double Century: श्रीलंकेच्या ‘निसांका’चं झंजावती वादळ, झळकावलं द्विशतक, दिग्गजांशी बरोबरी, तर हिटमॅन रोहित शर्माला टाकलं मागे

Pathum Nissanka Smashes Double Century: मुंबई : श्रीलंकेचा (Sri Lanka National Cricket Team) क्रिकेटर पथुम निसांकानं (Pathum Nissanka) इतिहास रचला आहे. निसांकानं शनिवारी (9 फेब्रुवारी) पल्लेकेले येथे खेळवण्यात आलेल्या अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात नाबाद 210 धावा केल्या. निसांकानं 139 चेंडूंच्या खेळीत 20 चौकार आणि आठ षटकार मारले आहेत. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा निसांका हा पहिला श्रीलंकेचा क्रिकेटपटू ठरला आहे. यापूर्वी श्रीलंकेसाठी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वोच्च डाव खेळण्याचा विक्रम सनथ जयसूर्याच्या (Sanath Jayasuriya) नावावर होता. जयसूर्यानं 2000 मध्ये शारजाच्या मैदानावर टीम इंडियाविरुद्ध 189 धावांची इनिंग खेळली होती. म्हणजेच, निसांकानं जयसूर्याचा 24 वर्ष जुना रेकॉर्ड मोडला आहे. वाचा सविस्तर 

आजचा शनिवार खास! ‘या’ राशींवर बजरंगबली करणार कृपा, सर्व समस्या सुटणार ;जाणून घ्या 12 राशींचे राशीभविष्य

Horoscope Today 10 February 2024 :  आजचं माझं  भविष्य काय? (Aajche Rashi Bhavishya)  आज  काय होणार?  किंवा आजचा  आपला दिवस कसा असणार प्रत्येक जण कधी ना कधी हा विचार करतच असतो. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच  भविष्यात काय होणार हे जाणून घेण्याची प्रबळ इच्छा असते. यासाठीच  आपल्या राशी आपल्याला मदत करतात. आज मेष ते मीन राशीमध्ये काय लिहिले आहे. कोणासाठी  आजचा दिवस कोणासाठी शुभ किंवा  अशुभ कोणासाठी हे  समजण्यासाठी सविस्तरपणे वाचा आजचे राशीभविष्य… वाचा सविस्तर 

अधिक पाहा..

Related posts