Reliance Consumer Buys Paan Pasand Maker Firm mukesh ambani fmcg company buys Ravalgaon Sugar Know More Details

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Reliance Consumer Buys Paan Pasand Maker Firm: मुंबई : आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत समावेश असणारे दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या साम्राज्यात आणखी एका कंपनीची भर पडली आहे. मुकेश अंबानींच्या रिलायन्स कंज्युमरनं (Reliance Consumer) एका कंपनीचं अधिग्रहण केलं आहे. ही कंपनी टॉफी ब्रेक आणि पान पसंद चॉकलेटसह इतरही अनेक उत्पादनांचं उत्पादन करते. 82 वर्षांपासून सुरू असलेली ही कंपनी गेल्या काही दिवसांपासून आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. अशातच आर्थिक अडचणींमधून बाहेर पडण्यासाठी कंपनीनं रिलायन्स समुहाच्या पंखाखाली जाण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, यापूर्वी मुकेश अंबानींनी कोल्ड ड्रिंक तयार करणारी कंपनी कॅम्पा कोलाचे मालकी हक्क खरेदी केले होते. 

रिलायन्स रिटेल बेंचर्सची FMCG कंपनी रिलायंस कंज्यूमर प्रॉडक्ट्स (Reliance Consumer Products) नं रावलगांव शुगर कंपनी (Ravalgaon Sugar) च्या कनफेक्शनरी बिझनेस खरेदी केला आहे. या कंपनीचा रिलायन्स कंज्यूमरसोबतचा करार तब्बल 27 कोटी रुपयांना पूर्ण झाला आहे. या डीलमध्ये मुकेश अंबानींच्या कंपनीकडे ट्रेडमार्क, रेसिपी आणि इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट्स आले आहेत.

कंपनीचा 1933 पासूनचा इतिहास 

पान पासंद चॉकलेट बनवणाऱ्या कंपनीनं शुक्रवारी एक्सचेंज फायलिंगमध्ये या डीलची माहिती दिली आहे. या कंपनीची स्थापना महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील रावळगाव गावात 1933 मध्ये व्यापारी वालचंद हिराचंद यांनी केली होती. 1942 मध्ये या कंपनीनं रावळगाव या नावानं टॉफी बनवण्यास सुरुवात केली. या कंपनीची रावळगावचे चॉकलेट्स आजही प्रसिद्ध आहेत. सध्या या कंपनीकडे मँगो मूड, कॉफी ब्रेक, टुटी फ्रूटी, पान पासंद, चोको क्रीम आणि सुप्रीम असे ब्रँड आहेत. 

कंपनीला घरघर, बाजारातील हिस्सा गमावला 

बिझनेस टुडेच्या म्हणण्यानुसार, रावळगाव शुगर कंपनीनं सध्या संघटित आणि असंघटित अशा दोन्ही क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेमुळे बाजारातील हिस्सा गमावला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कंपनी आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. प्रभावीपणे काम करण्याची क्षमता नाही आणि कच्चा माल, उर्जा आणि मजुरांच्या किमती वाढल्यानं सध्या कंपनीच्या नफ्यावर परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं. अनेक अडचणींचा सामना करुनही कंपनीने आजपर्यंत आपल्या एकाही उत्पादनांच्या किमतींत वाढ केलेली नाही.

रिलायन्सनं लॉन्च केलं ‘इंडिपेंडेंस’ ब्रँड 

रिलायन्सनं आणखी एक नवा ब्रँड बाजारात आणला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या रिटेल कंपनीनं या महिन्याच्या सुरुवातीला आपला ग्राहक पॅकेज्ड वस्तूंचा ब्रँड ‘इंडिपेंडन्स’ लॉन्च केला होता. तर यापूर्वी या रिलायन्स कंपनीनं कॅम्पा खरेदी केली होती.

कोला मार्केटमध्ये रिलायन्सची एन्ट्री

रिलायन्सचे चेअरमन (Reliance Chairman) मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आपला रिटेल व्यवसाय वाढवत असताना एकामागून एक नव्या क्षेत्रात प्रवेश करत आहेत. या क्रमानं कॅम्पा कोलासोबत त्यांनी कोला मार्केटमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी कॅम्पा कोला ब्रँड निवडला, जो 70 च्या दशकात अव्वल होता आणि प्युअर ड्रिंक्स ग्रुपशी सुमारे 22 कोटी रुपयांचा करार करून त्याची मालकी स्वतःकडे घेतली. 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts