fdi investigation against Paytm Payments Bank investments made from China Ant Group One97 investment marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Paytm Payments Bank : आरबीआयने कारवाईचा बडगा उचललेल्या पेटीएम पेमेंट्स बँकेसमोरील   (Paytm Payments Bank) अडचणीत आणखी वाढ होणार असल्याचं चित्र आहे. पेटीएममध्ये चीनमधून करण्यात आलेल्या गुंतवणुकीची चौकशी करण्यात येणार आहे.  One97 कम्युनिकेशन्सची उपकंपनी असलेल्या Paytm Payments Services Limited (PPSL) मध्ये चीनमधून गुंतवणूक करण्यात आली आहे. चीनच्या अँट ग्रुपने (Ant Group) वन 97 कम्युनिकेशन्समध्ये गुंतवणूक केली आहे. 

PPSL ने RBI कडे पेमेंट अॅग्रीगेटर आणि पेमेंट गेटवे म्हणून काम करण्यासाठी नोव्हेंबर 2020 मध्ये परवान्यासाठी अर्ज केला होता. RBI ने नोव्हेंबर 2022 मध्ये PPSL चा अर्ज नाकारला. FDI नियमांतर्गत प्रेस नोट 3 चे पालन करण्यासाठी कंपनीला ते पुन्हा सबमिट करण्याचे आदेश देण्यात आले. यानंतर कंपनीने एफडीआय मार्गदर्शक तत्त्वांनुसार 14 डिसेंबर 2022 रोजी अर्ज दाखल केला. 

आंतर-मंत्रालय समिती करणार चौकशी

इकॉनॉमिक टाइम्सने सूत्रांचा हवाला देत दावा केला आहे की, एक आंतर-मंत्रालयीन समिती PPSL मध्ये चीनकडून झालेल्या गुंतवणुकीची चौकशी करणार आहे. या तपासानंतर एफडीआयच्या मुद्द्यावर निर्णय घेतला जाईल. एफडीआय प्रेस नोट 3 अंतर्गत, भारताला लागून असलेल्या सीमावर्ती देशातून जर कोणतीही गुंतवणूक होणार असेल तर त्याची पूर्वपरवानगी घेणं गरजेचं असल्याचं नियम सांगतो.

कोविड-19 साथीच्या आजारानंतर देशांतर्गत कंपन्यांना टेकओव्हर करण्यापासून वाचवणे हा या नियमाचा उद्देश होता. हा नियम चीन, बांगलादेश, पाकिस्तान, भूतान, नेपाळ, म्यानमार आणि अफगाणिस्तान यांसारख्या देशांना लागू होतो ज्यांच्या सीमा भारताशी लागून आहेत.

पेटीएम पेमेंट्स बँकेला ठेवी घेण्यास बंदी

गेल्या महिन्यात आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकेला कोणत्याही प्रकारची ठेव किंवा टॉप अप घेण्यास बंदी घातली होती. 29 फेब्रुवारीनंतर बँक कोणत्याही ग्राहकाच्या खात्यात, प्रीपेड इन्स्ट्रुमेंट, वॉलेट किंवा फास्टॅगमध्ये पैसे जमा करू शकणार नाही. सर्वसमावेशक प्रणाली ऑडिट अहवालानंतर आरबीआयने हा कठोर निर्णय घेतला आहे. बँक अनेक नियम पाळत नसल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले होते. 11 मार्च 2022 रोजी बँकेला नवीन ग्राहक जोडण्यास बंदी घालण्यात आली होती.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts