Bihar Politics Marathi News Before floor test police presence at Tejashwi Yadav residence JDU MLAs shifted to hotel

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Bihar Politics : बिहारमध्ये राजकीय हालचाली वाढल्याचं चित्र दिसत आहे. बिहारमध्ये सरकार बदलल्यानंतर आज होणाऱ्या विश्वासदर्शक ठरावापूर्वी (Floor Test) नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या जेडीयू (JDU) पक्षातील आमदारांना हॉटेलमध्ये हलवण्यात आले आहे. भाजपच्या (BJP) एनडीएमध्ये परतल्याने जेडीयूसाठी ही मोठी परीक्षा मानली जात आहे. तर तेजस्वी यादवांच्या घराला पोलिसांनी चारही बाजूंनी वेढा दिल्याचं समजत आहे. दरम्यान, तेजस्वी यादव यांच्या घराला वेढा दिलेल्या पोलिस दलामागे नितीश कुमार यांच्या हातातून सरकार जाण्याच्या भीतीचा ठपका राष्ट्रीय जनता दलाने लावला आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, आरजेडीचे सर्व आमदार तेजस्वी यांच्या निवासस्थानी उपस्थित आहेत. काहींना त्यांच्या संमतीशिवाय नजरकैदेत ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन निवासस्थानी हजर आहे.

 

 

 

तेजस्वी यादवांच्या घराला पोलिसांचा चारही बाजूंनी वेढा

बिहारमधील नव्या सरकारच्या विश्वासदर्शक ठरावामुळे एकीकडे जेडीयूच्या आमदारांना पाटणा येथील हॉटेलमध्ये हलवण्यात आले आहे, तर दुसरीकडे आरजेडीचे तेजस्वी यादव यांच्या घराजवळ मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

 

आज होणार विश्वासदर्शक ठराव

फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला नितीश कुमार यांनी विरोधी पक्षांसोबत स्थापन केलेली महाआघाडी सोडली होती. ते त्या आघाडीचे प्रमुख होते, पण त्यांना समन्वयक बनवले गेले नाही. त्यामुळे त्यांनी भाजपसोबत नवे सरकार स्थापन केले. अशात मुख्यमंत्री नितीश कुमार सोमवारी होणाऱ्या विश्वासदर्शक ठरावात विजयी होतील, अशी आशा आहे. त्यांना त्यांच्या पक्षातील सहकाऱ्यांचाही पाठिंबा आहे. नितीश कुमार यांनी महाआघाडी सोडण्याचे कारण सांगितले की, तेथे सर्व काही आलबेल नाही. ते म्हणाले की, मला त्यांच्या समर्थक तसेच कार्यकर्त्यांकडून सल्ला मिळाला होता, त्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला. सोमवारी विश्वासदर्शक ठरावापूर्वी, रविवारी संध्याकाळी झालेल्या आमदारांच्या बैठकीला जेडीयूचे तीन आमदार आले नाहीत.

कशी असतील समीकरणं?

सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी 122 मतांची गरज आहे. 243 सदस्यीय विधानसभेत जेडीयूचे 45 आमदार आहेत, तर त्यांचे मित्रपक्ष भाजप आणि हिंदुस्थानी आवाम मोर्चा (सेक्युलर) चे अनुक्रमे 79 आणि 4 आमदार आहेत. दुसऱ्या अपक्ष आमदाराच्या पाठिंब्याने, एनडीएकडे 128 आमदार आहेत, तर महाआघाडीकडे 115 आमदार आहेत. 

 

राष्ट्रीय जनता दलाची सोशल मीडियावर पोस्ट

‘सरकारला घाबरून नितीश कुमार यांनी हजारो पोलिस पाठवून तेजस्वीजींच्या निवासस्थानाला चारही बाजूंनी वेढा घातला आहे. त्यांना कोणत्याही बहाण्याने निवासस्थानात घुसून आमदारांसोबत अनुचित प्रकार घडवायचा आहे. बिहारमधील जनता नितीशकुमार आणि पोलिसांची कुप्रथा पाहत आहे. लक्षात ठेवा, घाबरून नतमस्तक होणाऱ्यांमध्ये आम्ही नाही. हा विचारधारेचा संघर्ष आहे. आम्ही तो लढू आणि जिंकू, कारण बिहारमधील न्यायप्रेमी जनता पोलिसांच्या या दडपशाहीला विरोध करतील. जय बिहार! जय हिंद.’

 

 

 

 

 

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts