dsp shrestha thakur husband rohit raj is fake irs officer police complaint in kaushambi ghaziabad



( प्रगत भारत । pragatbharat.com)

Shrestha Thakur : मेट्रोमोनियल साईटवरुन अनेकदा खोटी माहिती टाकून फसवणूक केल्याची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. पण उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) पोलिसांत तैणात असणाऱ्या महिला पोलिस उपअधीक्षक श्रेष्ठा ठाकुर (Shrestha Thakur) या फसवणुकीची शिकार झाल्या आहेत. श्रेष्ठा ठाकुर (Shrestha Thakur) यांना एका व्यक्तीनं खोटा आयआरएस अधिकारी होऊन गंडवलेय. त्या व्यक्तीने श्रेष्ठा ठाकुर यांच्याकडून लाखो रुपयेही लुबाडले केले. लग्नानंतर एसपी श्रेष्ठा ठाकुर यांना फसवणूक झाल्याचं समजलं. श्रेष्ठा ठाकुर यांनी घटस्फोट घेतला, पण तो पत्नीच्या नावाने अजूनही लोकांकडून पैसे लुबाडतो. यामुळे वैतागलेल्या श्रेष्ठा ठाकुर यांनी गाजियाबादच्या कौशांबी स्थानकात पूर्वाश्रमीचा पतीविरोधात तक्रार दाखल केली.

खोटं सांगून महिला अधिकाऱ्याला फसवलं – 

श्रेष्ठा ठाकुर या सध्या उत्तर प्रदेश पोलिसात उपअधीक्षक पदावर कार्यरत आहेत. त्या 2012 बॅचच्या पीपीएस अधिकारी आहेत. सध्या त्या शामली येथे कार्यरत आहेत. उपअधीक्षक यांना उत्तर प्रदेशमध्ये लेडी सिंघम या नावाने ओळखले जाते. गाजियाबादच्या कौशांबी पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीनुसार, 2018 मध्ये त्यांचं लग्न रोहित राज नावाच्या व्यक्तीसोबत झालं होतं. श्रेष्ठा ठाकुर आणि रोहित यांची ओळख मेट्रोमोनियल साईटवरुन झाली होती. रोहितने स्व:ला 2008 बॅचचा आयआरएस अधिकारी असल्याचं सांगितलं होतं. रांची येथे कार्यकरत असल्याचं त्याने सांगितलं होतं. श्रेष्ठा ठाकुरच्या कुटुंबियांनी रोहित आणि कुटुंबिंयाबद्दल चौकशीही केली होती. 

सेम टू सेम नावं… 

श्रेष्ठा ठाकुरच्या कुटुंबियांनी रोहित आणि कुटुंबिंयाबद्दल चौकशीही केली होती.  मिळालेल्या माहितीनुसार,  2008 मध्ये रोहित राज नावाचा व्यक्ती खरेच आयआरएससाठी सिलेक्ट झाला होता. तो रांची येथे कार्यरत आहे. दोघांच्या माहितीमध्ये साम्य आढळल्यामुळे श्रेष्ठा ठाकुरच्या कुटुंबियांचा गैरसमज झाला. त्यामधून रोहित याने श्रेष्ठा ठाकुरची फसवणूक केली. आरोपी रोहितने 2008 बॅचच्या अधिकाऱ्याच्या नावाचा वापर करत श्रेष्ठा ठाकुर यांना गंडवलं. 

लग्नानंतर सत्य आलं समोर – 

लग्नानंतर श्रेष्ठा ठाकुर यांना आपली फसणूक झाल्याचं समोर आले. आपला पती आयआरएस अधिकारी नाही, त्याने फसवणूक करुन लग्न केल्याचं समजल्यानंतर श्रेष्ठा ठाकुर यांच्या पायाखलची वाळू सरकली. पण लग्न वाचवण्यासाठी तिनं तडजोड करण्याचा प्रयत्न केला. पण रोहित राज याची खोड गेली नाही, त्याने  श्रेष्ठा ठाकुर यांच्या नावाचा वापर करत अनेकांना फसवलं. अनेकांकडून पैसे लुबाडले. त्यामुळे वैतागलेल्या श्रेष्ठा ठाकूर यांनी पोलिसांत तक्रार दिली.  श्रेष्ठा ठाकुर यांनी घटस्फोट घेतला, सध्या रोहितविरोधात पोलीस तपास करत आहेत. 

अधिक पाहा..

Related posts