Who is the NCP candidate for the Rajya Sabha elections marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Rajya Sabha Elections : राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajya Sabha Election) अर्ज भरण्याची अंतिम तारीख 15 फेब्रुवारी आहे. मात्र, अद्यापही राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाकडून उमेदवार कोण ? याबाबत निश्चित झालेलं नाही. सध्या पक्षात ओबीसी समाजाला संधी द्यावी अशी मागणी करणारा एक ग्रुप आहे. तर दुसरा ग्रुप अल्पसंख्यांक चेहऱ्याला संधी देण्याची मागणी करत आहे. त्यामुळं आता राष्ट्रवादी काँग्रेस कोणाला राज्यसभेवर पाठवणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.  

समीर भुजबळ यांना उमेदवारी देण्याची मागणी

राज्यसभेसाठी अर्ज भरण्यासाठी आता 2 दिवस बाकी आहेत. मात्र, अजुनही राष्ट्रवादी काँग्रेसचा लोकसभेचा उमेदवार कोण असेल? हे स्पष्ट झालेलं नाही. सध्या अजित पवार यांना वेगवेगळी शिष्टमंडळे भेटायला येऊन जात असून, आप आपल्या नेत्यासाठी राज्यसभेची उमेदवारी मागत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून छगन भुजबळ आपले पुतणे समीर भुजबळ यांना संधी द्यावी, यासाठी वरिष्ठांवर दबाव आणत असल्याची चर्चा आहे. तर राज्यातील ओबीसी समाजात सरकारबाबत असलेला रोष पाहता तो शांत करण्यासाठी ओबीसी प्रतिनिधी दिल्यास फायदा होईल अशी भुजबळांची भुमिका आहे.

पार्थ पवार यांना उमेदवारी देण्याचा मतप्रवाह

अल्पसंख्याक समाजाच्या वतीनं देखील आपल्या समुदायाला संधी मिळावी अशी भुमिका आहे. नुकतेच काँग्रेसमधून राष्ट्रवादीत आलेले बाबा सिद्धकी, माजी मंत्री नवाब मलिक यासाठी इच्छुक असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे. नवाब मलिक नुकतेच राष्ट्रवादीतील सर्व वरिष्ठ नेत्यांना भेटून गेले आहेत. यासोबतच अल्पसंख्याकचे प्रदेशाध्यक्ष इद्रिस नायकवडी हे देखील इच्छुक आहेत. सध्या पक्षात अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना संधी मिळावी असा देखील एक मतप्रवाह आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पार्थ पवार यांनी कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू केली आहे. मात्र पार्थ पवार यांना उमेदवारी दिल्यास सर्व पदे एकाच कुटुंबात अशी चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर दुसरीकडं सुनील तटकरे यांना संधी दिल्यास त्यांना पक्षाचं काम करता येईल असा ही एक मतप्रवाह आहे. 

कर्जत येते पार पडलेल्या बैठकीत अजित पवार यांनी लोकसभेसाठी 4 जागांवर दावा सांगितला होता. यामधे सुनील तटकरे रायगडची जागा लढवतील असं ही स्पष्टं होतं. जर सुनिल तटकरे यांना राज्यसभेची उमेदवारी दिली तर रायगड जागेवरील दावा सुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुनील तटकरे यांना राज्यसभेवर पाठवण्याबाबत निर्णय झालेला नाही. एकंदरीतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अद्याप राज्यसभेच्या जागेबाबत निर्णय झाला नसून पुढील 2 दिवसांत निर्णय होणार आहे.

महत्वाच्या बातम्या:

Rajya Sabha : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार जाहीर, एकाही केंद्रीय मंत्र्याला उमेदवारी नाही; कुणाला संधी, कुणाचा पत्ता गुल? वाचा संपूर्ण यादी

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts