Khappar – Shool Yog : 48 वर्षांनंतर धोकादायक शूल आणि खप्पर योग! 7 मार्चपर्यंत ‘या’ राशींवर धनहानीसह आरोग्यावर परिणाम

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Shool and Khappar Yog in Kundli : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह वेळोवेळी अशुभ आणि शुभ योगाची निर्मिती करत असतो. काही योग हे गरीब व्यक्तीला रातोरात मालामाल करतो. तर काही अशुभ योग तर त्या व्यक्तीच्या आयुष्यात वादळ आणतात. ज्या व्यक्तींच्या कुंडलीत अशुभ योग निर्माण होतात त्यांना आर्थिक समस्यांपासून आरोग्याची गंभीर समस्या जाणवते. असाच अशुभ घातक आणि धोकादायक योग 48 वर्षांनंतर शूल आणि खप्पर योग एकत्र निर्माण होणार आहे.  7 मार्चपर्यंत शनिवार, मंगळवार आणि रविवार हा अत्यंत अशुभ योग असणार आहे. जेव्हा संक्रमणादरम्यान 7 ग्रह 3 राशींमध्ये येतात, तेव्हा शूल योगाची निर्मिती होते. अशा स्थितीत या योगांच्या निर्मितीमुळे काही राशींच्या आयुष्यात वादळ येणार आहे. (After 48 years of dangerous Khappar and Shool Yog Health effects with loss of wealth on these zodiac sign till 7th March)

मिथुन रास (Gemini Zodiac)

शूल आणि खप्पर योग तुमच्यासाठी हानिकारक ठरणार आहे. कारण तुमच्या राशीतून 4 ग्रह मृत्यू स्थानात येत असल्याच वैदिक ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ म्हणतात . मंगळ, शुक्र, सूर्य आणि बुध तुमच्या राशीचा स्वामी मृत्यूस्थानी असणार आहे. तर, तुमच्या मुलाचा स्वामी मृत्यूच्या ठिकाणी असणार आहे. लाभाचा स्वामी मंगळ लाभ गृहात असणार आहे. त्यामुळे आरोग्याची समस्या वाढणार असून प्रकृतीकडे लक्ष द्या. तुमचं आर्थिक नुकसानही होणार आहे. एखाद्या विषयावर तणाव वाढणार आहे. यावेळी तुम्ही प्रवास टाळलेलाच तुमच्या हिताच होईल. 

सिंह रास (Leo Zodiac) 

शूल आणि खप्पर योग तयार झाल्यामुळे सिंह राशीच्या लोकांसाठी अडचणी दिवसेंदिवस वाढ होणार आहे. कारण तुमच्या राशीमध्ये धनाचा स्वामी बुध कर्जाच्या घरात असणार आहे. त्यामुळे दरिद्र योगही तुमच्या कुंडलीत तयार होत आहे. तसंच करिअरचा स्वामी सहाव्या घरात असल्याने दैन्य योग तयार होत आहे. त्यामुळे, यावेळी तुम्ही कर्जात बुडणार आहात. शिवाय तुम्हाला मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी होणार आहे. यावेळी तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवणे योग्य होईल नाहीतर तुमचं कोणाशी तरी भांडण होण्याची भीती आहे. आरोग्याकडेही दुर्लक्ष करु नका. 

वृश्चिक रास (Scorpio Zodiac)  

शूल आणि खप्पर योग तुमच्यासाठी हानिकारक ठरणार आहे. कारण तुमच्या राशीचा स्वामी मंगळ, बुध आणि शुक्र तिसऱ्या भावात असणार आहे. गुरु आणि चंद्र सहाव्या घरात असेल तर सूर्य आणि शनि चौथ्या घरात असेल. त्यामुळे यावेळी तुम्ही तणावग्रस्त असणार आहात. तुमचं कुटुंबातील सदस्याशी भांडणही होण्याची दाट शक्यता आहे. यावेळी तुम्ही कोणालाही पैसे उधार देऊ नका अन्यथा पैसे परत कधी मिळणार नाही हे लक्षात ठेवा. तुमच्या जोडीदाराशी मतभेद होणार आहे. 

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

 

Related posts