wedding without invited for eating jailed law ipc 442 and 452 check details

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Wedding :  लगीनसराईला सुरुवात झाली आहे. आजूबाजूला एखादं लग्न (marriage) असेल तर अनेकजण न बोलवताही उपस्थिती लावतात. वरपक्ष (Varpaksh)  अथवा वधूपक्षाचं काही देणघेणं नसतानाही अनेक जण लग्नात येतात जेवण करतात अन् तिकडून कलटी मारतात. तुम्हाही अशी चूक करत असाल तर सावधान… कारण या छोट्या चुकीमुळे तुम्हाला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.  होय… एखाद्या कार्यक्रमाला आमंत्रण नसताना उपस्थिती लावल्यास गुन्हा दाखल होऊ शकतो. इतकेच नाही तर दोन वर्ष तुरुंगात जावं लागू शकतं. गेल्या महिन्यात उत्तर प्रदेशमध्ये लग्नाला न बोलवता गेल्यामुळे दोन जणांना अटक करण्यात आले होते. 

लग्नात मोफत जेवण केल्यामुळे दोन जणांना उत्तर प्रदेशमध्ये अटक करण्यात आली. फुकटात जेवण करण या दोघांना महागात पडलेय. झालं असं की, लखनौमध्ये एका लग्नात दोन जणांनी हजेरी लावली. त्यानंतर पोटभर जेवणही केले अन् बिंदास्त डान्स केला. त्यांचा डान्स पाहिल्यानंतर लग्नातील काही लोकांना त्यांच्यावर संशय आला. काही जणांनी त्या दोघांना ताब्यात घेतले अन् पोलिसांना बोलवलं. त्यांची विचारपूस केली असता ते लग्नातील दोन्ही बाजूकडच्या कुणाच्याच ओळखीतले नव्हते. पोलिसांनी त्या दोघांना अटक केली. त्यानंतर त्यांची रवानगी थेट तुरुंगात झाली. 

न बोलवता लग्नात जाल तर तुरुंगात होईल रवानगी, कायदा काय सांगतो ? 

जर तुम्ही लग्नसमारंभात आमंत्रणाशिवाय जाऊन जेवणावर ताव मारण्याचा विचार करत असाल तर थांबा.. अशी चूक तुम्हाला महागात पडू शकते. तुम्हाला तुरुंगवासही होऊ शकतो. याबाबत वकील उज्ज्वल त्यागी यांनी सोशल मीडियावर माहिती दिली. त्यागी यांनी व्हिडीओत सांगितलेय की, जर तुम्ही एखाद्या कार्यक्रमात न बोलवता जात असाल तर हा गुन्हा आहे. तुमच्यावर भादवि कलम 442 आणि 452 अंतर्गत गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. यामध्ये दोन वर्षांपर्यंतचा तुरुंगवास होऊ शकतो.  लग्नसमारंभात न बोलवता जाणं ट्रेसपासिंगचा प्रकार आहे. त्यागी यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. कमेंट्सचा पाऊस पडतोय.

  


आणखी वाचा :

 अशोक चव्हाण, बाबा सिद्दिकी, मिलिंद देवरा, ज्योतिरादित्य शिंदे ते गुलाम नबी आझाद, काँग्रेस उभारण्यात ज्यांचा हात, त्यांनीच सोडली साथ! 

अशोक चव्हाणांची मदत कुठे घ्यायची आम्हाला चांगलेच माहित – देवेंद्र फडणवीस 

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts