Pune news Pune Metro News pune traffic Pune metro Low response by passenger couse Of Traffic | Pune Metro : हौस

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : पुण्यातील वाहतूक कोंडी कमी  (Pune Metro) करण्यासाठी पुण्यात मेट्रो सुरु करण्यात आली. मेट्रोमुळे वाहतूक कोंडी फुटेल,अशी पुणेकरांना आणि प्रशासनाला अपेक्षा होती मात्र झालं उलटंच. पुणे मेट्रो सुरु झाली पण त्यासोबतच वाहतूक कोंडी आणि शहरात दुचाकींची संख्याही वाढली. सुरुवातीला काही दिवस मेट्रोची हौस-मौज केली पण नंतर पुणेकरांनी मेट्रोकडे पाठ फिरवल्याचं दिसत आहे. 

पुण्यात पुणे मेट्रोकडून वनाझ ते रामवाडी आणि पिंपरी चिंचवड ते स्वारगेट असे 33 किलोमीटरचे दोन मेट्रो मार्ग उभारण्यात येत आहेत. त्यातील पंचवीस किलोमीटरचे काम पूर्ण झालं आहे आणि आठ किलोमीटरचे राहिल आहे . मात्र या 25 किलोमीटरवर प्रवाशांची संख्या वाढण्याऐवजी घटली आहे. सुरुवातीला मेट्रो कशी आहे हे पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली. पुणे मेट्रोत ढोल ताशा , फ्याशन शो , जादूचे प्रयोग , झिम्मा – फुगडी असे अनेक खेळ खेळले गेले. मात्र सुरुवातीची उत्सुकता संपल्यावर ही प्रवासी संख्या कमी होत गेली. 

कोणत्या महिन्यात किती प्रवासी संख्या?

2023 मध्ये ऑगस्ट महिन्यात 66032 प्रवासी 
2023 मध्ये  सप्टेंबर महिन्यात 65542  प्रवासी 
2023 मध्ये  ऑक्टेंबर महिन्यात  53987 प्रवासी 
2023 मध्ये  नोव्हेंबर महिन्यात 47292 प्रवासी 
2023 मध्ये  डिसेंबर महिन्यात 53268  प्रवासी 
2023 मध्ये  जानेवारी महिन्यात 56633 प्रवासी 

दुचाकींची संख्या वाढली

एकीकडे मेट्रोमध्ये प्रवासी संख्या वाढत नसताना रस्त्यावरील वाहनांमध्ये मात्र कोणतीही कमी झालेली नाही. पुण्यात मागील आर्थिक वर्षात 3,04,718 नवीन वाहने रस्त्यावर आली होती तर या 2023 – 2024 या आर्थिक वर्षात डिसेंबरपरर्यंत ही संख्या 2,53,726 इतकी आहे. आर्थिक वर्ष संपेपर्यंत ही संख्या आणखी वाढणार आहे . मेट्रो सुरु होऊन एक वर्षानंतर देखील वाहनांची संख्या वाढत आहे. 

आज पुण्यात एकूण वाहनांची संख्या 45 लाख आहे . त्यापैकी 34 लाख या दुचाकी आहेत. मेट्रोमध्ये पुरेशी मेट्रो संख्या नसताना अनेक लोक अजूनही त्यांच्या खाजगी वाहनांनी प्रवास करत आहेत. घरापर्यंत मेट्रो जात नाही. घरापासून मेट्रो स्टेशनपर्यंत जाण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नाही, अशी अनेक कारणं लोकांनी सांगितली आहेत. 

रखडलेल्या कामामुळे वाहतूक कोंडीत भर

पुणे मेट्रोचे सर्वात मोठे स्टेशन जिल्हा न्यायालयासमोर सहा किलोमीटरच्या जागेमध्ये आहे. अनेक मजली रेल्वे स्टेशन आहे. इथून मुठा नदी पात्राच्या खालून मेट्रो स्वारगेटकडे जाते. पुणे मेट्रोचे काम सात वर्षे सुरु आहे. आधी ते तेराशे कोटी रुपयांचे होते. मात्र उशीर झाल्यानं त्यात अकराशे कोटी रुपयांची वाढ झाली आहे.  पुण्यातील दुसरी मेट्रो PMRDA कडून हिंजवडी ते जिल्हा न्यायालय या अठरा किलोमीटरच्या मार्गावर उभारण्यात येत आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या समोर PMRDA  मेट्रो आणि पुणे मेट्रो चे मार्ग एकत्र येतात. मात्र इथे राज्यपालांचे राजभवन हे सरकारी निवासस्थान असल्यानं राजभवनने सुरक्षाच्या कारणास्तव मेट्रोच्या कामाला आक्षेप घेतला आहे. त्यामुळं इथलं काम सहा महिने रखडलं आहे. रखडलेल्या कामामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे.  

इतर महत्वाची बातमी-

 

 

 

 

 

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts