technology news youtube monetization 2024 know more about rules policy and process marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

YouTube Monetization : आजकाल सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण, सोशल मीडियावरून कमाई करणाऱ्यांची संख्या या तुलनेत कमीच आहे. सोशल मीडियावरून पैसे कमावण्याचा एक मार्ग म्हणजे YouTube. या माध्यमातून तुम्ही शॉर्ट्स आणि लांब असे दोन्ही प्रकारचे व्हिडीओ अपलोड करू शकता. या दोन्ही व्हिडीओमधून पैसे कमावता येतात. पण ज्या लोकांना यु ट्यूब वरून पैसे कसे कमवायचे हे माहीत नाही, तसेच यातून कमाईचे कोणते वेगळे मार्ग आहेत हे माहित नाही? अशा लोकांसाठी ही महत्त्वाची माहिती आहे. याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 

YouTube मॉनिटायझेशनची प्रक्रिया

  • यासाठी तुम्हाला यु ट्यूबचे दोन कार्यक्रम पूर्ण करावे लागतील. तुम्ही या दोन्ही कार्यक्रमांसाठी पात्र असाल तर तुम्ही तुमच्या चॅनेलची कमाई करू शकता.
  • यातील पहिला कार्यक्रम आहे प्रोग्राम पार्टनर (YPP), तुम्हाला या कार्यक्रमाचा भाग होण्यासाठी अर्ज करावा लागेल. यासाठी तुमच्या चॅनेलवर किमान 1000 सबस्क्रायबर्स असणं गरजेचं आहे. याशिवाय, तुमच्या चॅनेलच्या व्हिडीओवर गेल्या 12 महिन्यांत किमान 4000 तास पाहण्याचा कालावधी असावा.
  • YouTube चॅनेल आणि व्हिडीओ YouTube च्या धोरणानुसार असावेत. यामध्ये समुदाय मार्गदर्शक तत्त्वे, कॉपी राईट धोरण आणि सेवा अटींचा समावेश आहे.

Google AdSense अकाऊंट 

YPP कार्यक्रमासाठी स्वीकारल्यानंतर, तुम्हाला तुमचे Google AdSense अकाऊंट तयार करावे लागेल. यानंतर तुम्ही YouTube स्टुडिओमध्ये तुमच्या चॅनलची कमाई करू शकता.

YouTube मोनेटायझेशनसाठी अर्ज करा

  • YouTube स्टुडिओमधील “Monetization” ऑप्शनवर क्लिक करा. यानंतर “Join the YouTube Partner Program” या ऑप्शनवर क्लिक करा.
  • YouTube च्या नियम आणि अटींचे पालन करण्यासाठी, स्वीकार करा आणि लागू करा या पर्यायावर क्लिक करा.
  • यानंतर, एक Google AdSense खाते तयार करा आणि ते तुमच्या YouTube चॅनेलशी कनेक्ट करा.
  • येथे YouTube Studio मध्ये Monetization वर क्लिक करा, आता चॅनल कमाई सक्षम करा. येथे तुम्ही तुमच्या चॅनेलसाठी जाहिराती आणि प्लेसमेंट सब निवडू शकता.

व्हिडीओ व्हायरल करण्यासाठी सोप्या टिप्स

  • यासाठी, सर्वात आधी तुम्हाला सुरुवातीला दररोज किमान 2 व्हिडीओ अपलोड करावे लागतील. 
  • यासाठी, तुमचा कंटेट आकर्षक आणि उत्तम दर्जाचा असावा. यामुळे अधिकाधिक यूजर्सना तुमच्या व्हिडीओवर क्लिक करता येईल. 
  • YouTube च्या अटी आणि नियमांचे पालन करून कंटेंट अपलोड करा आणि तुमच्या टार्गेट ऑडियन्सचा अॅक्टिव्ह टाईम लक्षात घ्या. तुमचे फॉलोअर्स अधिक अॅक्टिव्ह असताना व्हिडीओ अपलोड करा.

महत्त्वाच्या बातम्या : 

Samsung Galaxy : सॅमसंगच्या ‘या’ इअरबड्समध्ये Galaxy AI फीचर्सही आहेत; यूजर्सना नेमके कोणते फायदे मिळतील?

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts