Arvind Kejriwal on Lok Sabha Election 2024 aap will defeat bjp in 2029 electoons bjp mukta bharat marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली: एकीकडे भाजपने गेल्या दोन निवडणुकीपासून काँग्रेसमुक्त भारताचा नारा लगावत त्या पक्षाच्या अनेक नेत्यांना फोडलं, अनेकांना पराभूत केलं, तर दुसरीकडे आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी (Arvind Kejriwal) भाजपमुक्त भारताचा नारा दिला आहे. 2029 सालच्या निवडणुकीमध्ये आप पक्ष हा भाजपमुक्त भारत करेल असा दावा त्यांनी केला. दिल्ली विधानसभेमध्ये विश्वासमत ठरावाच्या वेळी त्यांनी हे वक्तव्य केलं. 

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. दिल्ली विधानसभेतील विश्वासदर्शक ठरावावर ते म्हणाले, “भाजपसाठी सर्वात मोठे आव्हान आम आदमी पक्षाचे आहे. भाजप जर कुणाला घाबरत असेल तर ती आम आदमी पार्टी आहे. या लोकसभेच्या निवडणुकीत जर भाजपचा पराभव झाला नाहीच तर 2029 साली आम आदमी पक्ष हा भारताला भाजपमुक्त करेल. 

 

भाजपने आपच्या नेत्यांना अटक केली

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, “भाजपने आप पक्षाचा इतका धसका घेतला आहे की ते आता पक्षाच्या प्रमुख नेत्यांना अटक करत आहेत. ते आमची सर्व कामं थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत, ते धमक्या देत आहेत. आमच्यावर चारही बाजूंनी हल्ले होत आहेत. त्यावर आता सर्वत्र प्रश्न उपस्थित होत आहे. मोदीजी हे अरविंद केजरीवाल यांना संपवण्याचा प्रयत्न करत आहेत का? हे असे केले जात आहे कारण आज देशात भाजपला सर्वात मोठा आव्हान देणारा आप हा पक्ष बनला आहे. आज भाजपला फक्त आम आदमी पार्टीपासून धोका आहे.

कोणत्याही दबावाखालीही जर एखादा नेता भाजपमध्ये सामील झाला नाही आणि तुरुंगात पाठवला गेला, तर तो नेता कट्टर प्रामाणिक आहे असं केजरीवाल म्हणाले. आपच्या नेत्यांवर भाजपने सर्वत्र छापे टाकले, त्यामध्ये त्यांना एक पैसाही सापडला नाही. आमची संपत्ती बँक खात्यात नाही तर ती लोकांच्या हृदयात आहे. 

अरविंद केजरीवाल म्हणाले की, “भाजपवाले स्वत:ला राम भक्त म्हणवतात. प्रभू रामांनी त्यांना दिल्लीतील रुग्णालयांमध्ये औषधे बंद करण्यास सांगितले होते का? आम्ही फरिश्ते योजनेतून 23 हजार लोकांचे प्राण वाचवले. त्यांनी फरिश्ते योजना बंद केली, केजरीवालांचा द्वेष केला. भाजपला दिल्लीतल्या लोकांना मारायचं आहे का? 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts