personal loan from bank then ask yourself these seven questions Interest rate duration or debt will be expensive bank rate marathi detail information

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Bank Personal Loan : आजच्या धकाधकीच्या आणि वाढत्या महागाईच्या काळात कर्जाची आवश्यकता नसलेली व्यक्ती सापडणे अवघड आहे. मध्यमवर्गीय असो वा उच्च मध्यमवर्गीय, प्रत्येकालाच कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या कर्जाची आवश्यकता असते. त्यातल्या त्यात वैयक्तिक कर्जाची  (Personal loan) आवश्यकता ही अनेकदा पडते. अशा परिस्थितीत जर तुम्हाला वैयक्तिक कर्जाची गरज लागलीच तर त्या आधी तुम्ही स्वतःला काही प्रश्न विचारले पाहिजेत, त्यामुळे भविष्यात कोणत्याही मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागणार नाही. 

वैयक्तिक कर्ज घेण्यापूर्वी खालील प्रश्न स्वतःला विचारा,

1. किती रकमेच्या कर्जाची गरज आहे?

आपल्याला किती रुपयांच्या कर्जाची गरज आहे हा पहिला प्रश्न स्वतःला विचारा. जर शक्य असेल तर घरचे वा नातेवाईकांकडून पैशाची जमवाजमव होते का ते पाहा. नसेल तर क्रेडिट कार्डवरून (Credit Card) पैसे उभे करता येतात का ते पाहा. जर रक्कम कमी असेल तर बँकेकडून कर्ज घेणं महाग पडू शकते. 

2. कर्जाची परतफेड करण्यासाठी किती वेळ लागू शकतो?

घेतलेले कर्ज ठराविक वेळेत जर परत करता आलं नाही तर तुम्ही डिफॉल्टर होऊ शकता. त्यामुळे आपली कमाई किती आहे आणि आपण किती हफ्ता भरू शकतो याचं गणित मनात पक्कं करा. त्यानंतर ते कर्ज ठराविक वेळेत कसं भरलं जाऊ शकतं याचंही गणित आखून काम करा. 

3. कर्जावर किती व्याज लागतं?

तुम्ही जर कर्ज घेतलं असेल तर त्यावर व्याज भरावे लागेल. अशा परिस्थितीत तुम्हाला स्वस्त दरात कर्ज कुठून मिळत आहे हे आधी तपासावे लागेल. अनेक वेळा हा दर कर्जाच्या कालावधीनुसार वाढतो किंवा कमी होतो. त्यामुळे कर्ज घेण्यापूर्वी त्यावर व्याज किती आहे याकडे लक्ष द्या, जेणेकरून नंतर तुम्हाला जास्त पैसे व्याज म्हणून द्यावे लागणार नाहीत.

4. EMI भरावा लागेल किंवा तुम्ही एकरकमी पैसे द्याल का?

तुम्ही कर्ज घेतल्यास, बहुतेकदा पुढच्या महिन्यापासून ईएमआय आकारणी सुरू होते. त्यामुळे कर्ज घेताना तुम्हाला पुढील महिन्यापासून ईएमआय भरता येईल की नाही याकडे लक्ष द्या. तुम्ही किती EMI भरू शकता हे देखील लक्षात ठेवा. तसेच जर तुमच्याकडे पैसे उपलब्ध झाले तर एकरकमी कर्ज फेडता येईल का तेही पाहा. अनेक वेळा लोकांना कर्जाची गरज असते, कारण त्यांना त्यांचे पैसे कोठूनही मिळत नाहीत किंवा त्यांचे पैसे कुठेतरी अडकलेले असतात. अशा परिस्थितीत निश्चित कालावधीनंतर व्याजासह संपूर्ण कर्जाची परतफेड करावी लागते. म्हणूनच कर्ज घेण्यापूर्वी हे प्रश्न स्वतःला विचारणे महत्त्वाचे आहे.

5. वैयक्तिक कर्जावर कोणती फी आकारली जाते?

तुम्ही पर्सनल लोन घेणार असाल तर त्यावर कोणते शुल्क लागू आहे हे तुम्हाला अगोदरच माहीत असायला हवे. अनेकदा असं होतं की की तुम्हाला व्याजदर खूपच आकर्षक वाटतात, परंतु तुम्हाला प्रक्रिया शुल्क, फाइलिंग फी, विमा इत्यादींसह विविध शुल्क भरावे लागतील. अशा परिस्थितीत तुम्ही पाहत असलेला कर्जाचा दर प्रत्यक्षात त्यापेक्षा खूपच महाग असू शकतो. त्यामुळे कर्जावरील फीची माहिती आधीच करून घ्या.

6. तुमचा क्रेडिट स्कोर काय आहे?

कर्ज घेताना क्रेडिट स्कोअर खूप उपयुक्त ठरतो. कोणतीही बँक तुम्हाला कर्ज देण्यापूर्वी तुमचा क्रेडिट स्कोअर तपासते. जर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला कमी दरातदेखील कर्ज मिळू शकते. चांगला क्रेडिट स्कोअर म्हणजेच CIBIL स्कोर असणे म्हणजे तुमच्या कर्जाची परतफेड करण्याची शक्यता खूप जास्त आहे.

7. कर्जाची रक्कम किती दिवसात हातात येईल? 

कर्ज घेताना ते मंजूर झाल्यानंतर कर्जाची रक्कम किती दिवसात हातात येईल याची माहिती असणं आवश्यक आहे. कारण काही ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने एका क्षणात तुमच्या अकाउंटवर कर्जाची रक्कम ट्रान्सफर केली जाते. तर काही बँका त्यासाठी 10 दिवसांपर्यंत वेळ घेतात. 

या सात प्रश्नांची उत्तरं जर कर्ज घेण्यापूर्वी तुम्हाला मिळाली, किंवा या बाबत तुमच्या मनात स्पष्टता असेल तरच कर्ज घेणं सोईस्कर ठरेल. अन्यथा कर्ज घेतल्यानंतर तुम्हाला अनेक समस्यांना सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे.

ही बातमी वाचा: 

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts