Pune News Tourists attacked by bees near Shivneri Fort 70 people injured four seriously

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

जुन्नर (जि. पुणे) : शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर किल्ले शिवनेरीजवळ असलेल्या तुळजालेणीवर फिरण्यासाठी आलेल्या  पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडली. जवळपास 70 पर्यटकांवर मधमाशांकडून हल्ला झाला. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला हा हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली. जखमींना जुन्नर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मधमाशांच्या मोहोळावर दगड मारल्याने मधमाशांनी हल्ला चढवला

याबाबत मिळालेली माहिती अशी की, जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्याजवळ असणाऱ्या तुळजा लेणी येथे मुंबई आणि पुण्याहून पर्यटक पर्यटनासाठी आले होते. दुपारच्या वेळी काही हुल्लडबाजी करणाऱ्या तरुण पर्यटकांनी मधमाशांच्या मोहोळावर दगड मारल्याने मधमाशांनी हल्ला चढवला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यात हल्ल्यात 70 पर्यटकांना मधमाशांनी चावा घेतला. या हल्ल्यात लहान मुलांना देखील मधमाशांनी चावा घेतला आहे. चार जण यात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जुन्नर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हल्ला झाल्याने पर्यटक सैरभैर पळू लागले

उद्या (19 फेब्रुवारी) शिवनेरी येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या कार्यक्रमासाठी सकाळपासूनच हजेरी लावणार आहेत. मात्र, आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने अनेक पर्यटक किल्ले शिवनेरी परिसरात फिरण्यासाठी आले होते. पूर्व संध्येला लेणी येथे पर्टकांची गर्दी होती. मात्र अचानक हल्ला झाल्याने पर्यटक सैरभैर पळू लागले. पुणे, मुंबई परिसरातील चिमुकल्यांसह महिला, जेष्ठ नागरिकांचा समावेश आहे. या हल्ल्यामध्ये चिमुकल्यासह 4 जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समोर आली असून  त्यांच्यावर जुन्नर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  काही हुल्लबाज पर्यटकांनी  मधमाश्यांच्या मोहोळावर दगड फेकल्याने  मधमाशांनी हा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. 

किल्ले शिवनेरीवर शिव जयंती उत्सवाची जोरदार तयारी सुरू असून शिव जनमोत्सव उत्साहात साजरा केला जाणार आहे. पोलिसांकडून योग्य ती काळजी घेण्याची तयारी सुरू केली असून पास देऊनच किल्ल्यावर प्रवेश दिला जात आहे. मात्र ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts