Post Office Savings Account Benefits with minimum deposits of 500 rs know interest rate benefit every detail in marathi  

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Post Office Savings Account Benefits : केंद्र सरकारच्या वा राज्य सरकारच्या कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी बँकेत खातं असणं गरजेचं आहे. तसेच पैशासंबंधित कोणताही व्यवहार करायचा असेल तरी खातं असणं आवश्यक आहे. त्यामुळेच देशातील बहुतांश लोकांनी बँकेत सेव्हिंग अकाउंट (Savings Account) म्हणजे बचत खातं उघडलं आहे. पण बँकेप्रमाणे पोस्ट ऑफिसमध्ये बचत खातं उघडण्याची सोय उपलब्ध आहे. विशेष म्हणजे बँका बचत खात्यावर ज्या दराने व्याज देतात त्यापेक्षा अधिक व्याजदर पोस्टाच्या बचत खात्यावर दिला जातोय. 

बँकांपेक्षा चांगला व्याजदर (Post Office Savings Account Interest rate) 

बचत खात्यावर बँकांकडून व्याजदर दिला जातोय. हा व्याजदर सर्वसाधारपणे दोन ते तीन टक्क्यांपर्यंत असतो. पण पोस्टामध्ये बँकांपेक्षा जास्त व्याज मिळते. इतर बँकांच्या तुलनेत पोस्ट ऑफिस किती व्याजदर देतं त्याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे, 

  • पोस्ट ऑफिस बचत खात्यावरील व्याज – 4.0 टक्के
  • SBI बचत खात्यावरील व्याज-  2.70 टक्के
  • PNB बचत खात्यावरील व्याज-  2.70 टक्के
  • BOI बचत खात्यावरील व्याज-  2.90 टक्के
  • BOB बचत खात्यावर व्याज- 2.75 टक्के
  • HDFC बचत खात्यावरील व्याज- 3.00 टक्के ते 3.50 टक्के
  • ICICI बचत खात्यावरील व्याज- 3.00 टक्के ते 3.50 टक्के

मिनिमम डिपॉजिट 500 रुपये (Post Office Savings Account Minimum Deposits)

तुम्ही बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते उघडत असलात तरी सर्व ठिकाणी तुमच्या खात्यात किमान शिल्लक राखणे फार महत्वाचे आहे, अन्यथा दंड भरावा लागतो. साधारणपणे बँकांमधील नियमित बचत खात्यावर किमान शिल्लक मर्यादा किमान 500 ते 1000 रुपये असते. परंतु पोस्ट ऑफिस बचत खाते किमान 500 रुपयांमध्ये उघडता येते.

बँकांप्रमाणे इतर सुविधा (Post Office Savings Account Benefits)

इतर बँकेप्रमाणेच तुम्हाला पोस्ट ऑफिस बचत खात्यावरही अनेक प्रकारच्या सुविधा मिळतात. खाते उघडल्यावर तुम्हाला चेकबुक, एटीएम कार्ड, ई-बँकिंग किंवा मोबाइल बँकिंग, आधार लिंकिंग इत्यादी सुविधा मिळतात. याशिवाय तुम्ही या खात्यावर सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ देखील घेऊ शकता.

पोस्टात कोण खाते उघडू शकते?

कोणतीही प्रौढ व्यक्ती पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडू शकते. याशिवाय पोस्टामध्ये जॉईंट अकाउंटही उघडण्याची सुविधा उपलब्ध आहे. 10 वर्षांच्या आतील अल्पवयीन मुलांसाठी खाते उघडायचे असल्यास, त्याचे पालक किंवा कायदेशीर पालक त्याच्या वतीने खाते उघडू शकतात. तर 10 वर्षांवरील अल्पवयीन मुले स्वतःच्या नावाने खाते उघडू शकतो. प्रौढ झाल्यानंतर अल्पवयीन मुलाच्या नावावर खाते हस्तांतरित करण्यासाठी नवीन खाते उघडण्याचा फॉर्म आणि केवायसी कागदपत्रे संबंधित पोस्ट ऑफिसमध्ये जमा करावी लागतात.

पोस्टात बचत खात्याशी संबंधित इतर कोणता खर्च आहे? 

  • पोस्ट ऑफिस बचत खात्यातील रक्कम 500 रुपयांपेक्षा कमी असल्यास आणि आर्थिक वर्षाच्या शेवटी ती या मर्यादेपेक्षा कमी राहिल्यास, 50 रुपये देखभाल शुल्क वजा केले जाते.
  • डुप्लिकेट पासबुक जारी करण्यासाठी तुम्हाला 50 रुपये द्यावे लागतील.
  • खाते विवरण किंवा जमा पावती जारी करण्यासाठी प्रत्येकी 20 रुपये भरावे लागतील.
  • खाते हस्तांतरण आणि खाते तारण यासाठी प्रत्येकी 100 रुपये खर्च येतो.
  • नामनिर्देशित व्यक्तीचे नाव बदलण्यासाठी किंवा रद्द करण्यासाठी 50 रुपये मोजावे लागतात.
  • एका वर्षात तुम्ही 10 चेकबुकची पाने कोणत्याही शुल्काशिवाय वापरू शकता आणि त्यानंतर प्रत्येक पानासाठी 2 रुपये शुल्क आकारले जाते.

ही बातमी वाचा: 

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts