Rahul Gandhi and Smriti Irani Loksabha Election Amethi BJP vs Congress Party Politics Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Amethi : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) पुन्हा येणार आमने-सामने येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमठी मतदारसंघातून दोघे पुन्हा एकदा लढणार असल्याचे बोलले जात आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. अमेठीचे माजी खासदार राहुल गांधी बऱ्याच काळानंतर अमेठी दौऱ्यावर येत आहेत. तर स्मृती इराणी सोमवापासून (दि.19) चार दिवसांच्या अमेठी दौऱ्यावर आहेत. 

दोघांचाही अमेठी दौरा 

भाजप खासदार स्मती इराणी 24 गावांत जनसंवाद यात्रा कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. तर राहुल गांधी अमेठी आणि गौरीगंज येथे पदयात्रा काढणार आहेत. याशिवाय ते बाबूगंज येथे सभेला संबोधित करतील. दरम्यान सध्या दोन्ही नेते अमेठीत दाखल झाल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. 

स्मृती इराणी अमेठी मतदारसंघात दौरा करणार आहेत. यावेळी त्या लोकांच्या समस्या समजून घेतील. यावेळी मतदारसंघातील अनेक गावांना त्या भेटी देणार आहेत. याशिवाय सामन्य लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांचा दौरा असेल, असे भारतीय जनता पार्टीकडून सांगण्यात आले आहे. 

भारत जोडो यात्रा कशी असेल?

राहुल गांधी दुपारी 1 वाजल्यापासून प्रतापगढ बॉर्डर दौरा सुरु होईल. त्यानंतर ते अमेठी आणि ककवा पोहोचतील.शिवाय ककवा रोड स्थित पोलीस लाईन येथे ते येणार आहेत. राहुल गांधी या परिसरातून पदयात्रा सुरु करतील. त्यानंतर ते गांधी चौक येथे दाखल होतील. त्यानंतर राहुल गांधी सगरा तिराहा येथे जात राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करतील. याशिवाय ते पाटण मंदिर पर्यंत पदयात्राही काढणार आहेत. 

2019 मध्ये अमेठी मतदारसंघात राहुल गांधींचा पराभव 

2019 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी आणि स्मृती इराणी याच्यात लढत झाली होती. या निवडणुकीत स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांचा दारुण पराभव केला होता. महाराष्ट्रातही काँग्रेसची केवळ एकच जागा निवडून आली होती. दरम्यान, आता 5 वर्षानंतर जनता कोणाला निवडून देणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Former Chief Ministers join BJP : अशोक चव्हाण ते अमरिंदर सिंग, आता कमलनाथ यांची चर्चा; काँग्रेसकडून मुख्यमंत्रिपद भूषवलेले किती नेते भाजपच्या गळाला?

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts