morning headlines breaking national state news live headlines bulletin morning 19 th February 2024 shiv jayanti 2024 shivneri india maharashtra latest update marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

Shiv Jayanti 2024 : प्रभो शिवाजी राजा! गल्लीपासून दिल्लीपर्यंत शिवजयंतीचा उत्साह, शिवनेरीवर शिवप्रेमींची गर्दी

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti : आज 19 फेब्रुवारी रोजी तारखेनुसार, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यासह देशात शिवजयंती (Shiv Jayanti) मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळत आहे. राज्यासह देशभरात शिवप्रेमींमध्ये उत्साह दिसून येत आहे. ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांची 394 वी जयंती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने ठिकठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आणि मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं आहे. वाचा सविस्तर…

School Uniform: गणवेश खरेदीचे टेंडर काढण्यापूर्वी गुजरातमधील व्यापाऱ्यांसोबत बैठक, गणवेश खरेदीच्या टेंडरमध्ये घोटाळ्याचा आरोप

ठाणे:  राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून 40 लाख 60 हजार विद्यार्थ्यांना मोफत गणवेश योजनेसाठी कापड खरेदीबाबत (School Uniform) शालेय शिक्षण विभागाच्या अखत्यारित असलेल्या महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्यावतीने १३८ कोटी रुपयांचे नुकतेच टेंडर काढले आहे. या टेंडरमध्ये गुजरात व राजस्थानच्या कापड उत्पादकांना अनुकूल अशा अटी- शर्ती टाकण्यात आल्या आहेत, असा आरोप समाजवादी पक्षाचे भिवंडीचे आमदार रईस शेख (Raees Shaik) यांनी केला आहे. वाचा सविस्तर…

भाजपा शरद पवारांना पॉवरफुल धक्का देणार? पश्चिम महाराष्ट्रातील विश्वासू नेत्याला पक्षात घेण्याच्या हालचालींना वेग

Maharashtra Politics : मराठवाड्यानंतर भाजपनं (BJP) आता पश्चिम महाराष्ट्राकडे आपला मोर्चा वळवला आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यामुळे भाजपची मराठवाड्यातील ताकद वाढली आहे. आता पश्चिम महाराष्ट्रातही ताकद वाढवण्यासाठी भाजपनं राजकीय हालचाली सुरु केल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षातील एक बड्या नेत्याला पक्षात आणण्याच्या जोरदार हालचाली सुरु झाल्याचं समजतेय. पश्चिम महाराष्ट्रातील शरद पवारांचा (Sharad Pawar) विश्वासून नेता लवकरच पक्षप्रवेश करेल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. वाचा सविस्तर…

Chandigarh Mayor Election : चंदीगडचे महापौर मनोज सोनकर यांचा राजीनामा, सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

Chandigarh News : चंदीगडमध्ये मोठ्या राजकीय उलथापालथी पाहायला मिळत आहे. नाट्मयी राजकीय घडामोडीनंतर विजयी झालेल्या चंदीगड महापौरांनी राजीनामा दिला आहे. चंदीगडचे महापौर (Chandigarh Mayor) मनोज सोनकर (Manoj Sonkar) यांनी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पूर्वीच राजीनामा दिला आहे. महापौरांच्या राजीमान्यामुळे चंदीगडच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा उलटफेर पाहायला मिळणार आहे. भाजप चंदिगड युनिटचे प्रमुख जतिंदर पाल मल्होत्रा ​​यांनी सांगितले की, मनोज सोनकर यांनी आयुक्तांकडे राजीनामा सोपवला आहे. वाचा सविस्तर…

Weather Update : देशात पुन्हा थंडीचा जोर वाढणार? कुठे वादळी वाऱ्यासह पाऊस, तर कुठे गारपिटीची शक्यता, हवामानाचे ताजे अपडेट जाणून घ्या

Weather Update : गेल्या आठवड्यात राज्यात अवकाळी पावसाचं धूमशान पाहायला मिळालं. विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पावसामुळे शेतीचं नुकसान झालं असून बळीराजा त्रस्त झाला होता. त्यानंतर आता हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यासह देशात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या ताज्या हवामान अंदाजानुसार, महाराष्ट्रासह देशातील काही भागात पाऊस तसेच गारपिट होण्याची शक्यता आहे, यामुळे थंडीचा कडाका देखील वाढण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर…

19 February In History : छत्रपती शिवाजी महाराज शिवनेरी किल्ल्यावर जन्म, आज इतिहासात काय घडलं होतं?

Today In History : इतिहासाच्या दृष्टीने प्रत्येक दिवसाचे महत्त्व असते.  फेब्रुवारी महिन्यातील 19 तारीख ही अनेक महत्त्वाच्या घटनांची साक्षीदार आहे. यातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आजच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवनेरी किल्यावर जन्म झाला. 18 पगड जातींना एकत्र करत शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभे केले. पाहुयात आजच्या दिवशी इतिहासात नेमकं काय झालं? वाचा सविस्तर…

Horoscope Today 19 February 2024 : कर्क, सिंह, कन्या राशींसाठी आजचा दिवस खास! करिअर, आर्थिक स्थिती कशी राहील? आजचे राशीभविष्य जाणून घ्या

Horoscope Today 19 February 2024 : राशीभविष्यानुसार, आज म्हणजेच 19 फेब्रुवारी 2024, सोमवार हा महत्त्वाचा दिवस आहे. आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? कर्क, सिंह, कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य वाचा सविस्तर…

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts