Sharad Pawar on Supreme Court says We bow down to the Supreme Court for recognising us as Nationalist Congress Party Sharadchandra Pawar ajit pawar jitendra awhad

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार शरद पवार गटाला दिलेले ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार’ (‘Nationalist Congress Party-Sharadchandra Pawar’) हे नाव पुढील आदेशापर्यंत कायम राहील, असे सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) सोमवारी सांगितले. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि केव्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठाने शरद पवार यांना पक्ष चिन्हासाठी निवडणूक आयोगाकडे जाण्याची परवानगी दिली. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला एका आठवड्यात ते देण्यास सांगितलं आहे. 

शरद पवार यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील अभिषेक सिंघवी म्हणाले की, निवडणूक आयोगाने 7 फेब्रुवारी रोजी दिलेला आदेश ही राज्यसभा निवडणुकीसाठी 27 फेब्रुवारीपर्यंत निवडणूक आयोगाने केलेली अंतरिम व्यवस्था आहे. “महाराष्ट्र विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 26 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे आणि आमचा गट 27 फेब्रुवारीनंतर कोणत्याही नाव किंवा चिन्हाशिवाय असेल,” असे त्यांनी न्यालाययाच्या निर्दशनास आणून दिले. 

शरद पवारांकडून न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत 

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शरद पवार यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभ दिवशी, भारताच्या निवडणूक आयोगाच्या आदेशाविरुद्ध माननीय सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला अंतरिम दिलासा दिला आहे. हा मतदारांचा विजय आहे कारण माननीय सर्वोच्च न्यायालयाने देशातील मतदारांना कमी लेखू नये असे निरीक्षण नोंदवले आणि मूळ पक्षाच्या तिकिटावर उमेदवार लढले याचे काय, असा सवाल केला.

आम्हाला पूर्णपणे मान्यता मिळू नये या मागणीवर जोरदार टीका करण्याव्यतिरिक्त, अशाच वादामुळे सीमेपलीकडील परिस्थितीचा उल्लेख केला आहे. आम्हाला ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार’ म्हणून मान्यता दिल्याबद्दल आणि माननीय ECI ला आमच्या चिन्हासाठी आमच्या अर्जावर 7 दिवसांच्या आत विचार करण्याचे निर्देश दिल्याबद्दल आम्ही माननीय सर्वोच्च न्यायालयापुढे नतमस्तक आहोत. लोकशाहीचा हा मोठा विजय आहे आणि डॉ. बी.आर. आंबेडकर यांच्या संविधानासाठी आम्ही लढत राहू.

जितेंद्र आव्हाडांकडूनही हल्लाबोल 

जितेंद्र आव्हाड यांनीही ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे. ते ट्विटमध्ये म्हणाले की, आज सर्वोच्च न्यायालयाने भारतातील लोकशाही वाचली पाहिजे, अशी ठाम भूमिका घेतली. ही आपणासाठी आश्वासक बाब आहे. अजित पवार यांच्या वकिलांनी आज सर्वोच्च न्यायालयात, शरद पवार यांना पक्ष आणि पक्षचिन्ह मिळू नये, अशी भूमिका मांडली. म्हणजेच शरद पवार नावाच्या सूर्याचा अस्त करावा, अशीच अजित पवार गटाची इच्छा त्यांच्या वकिलांनी वादविवादात पुढे आणली. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने, “भारतात लोकशाही आहे अन् लोकशाहीत कोणत्याही माणसाला पक्ष आणि चिन्ह न देणे हे अयोग्यच आहे. तुमच्या लोकांनी पक्षात फूट पाडली. त्याचा १० व्या अनुसुचिशी सबंध आहे की नाही ? 

आपल्या देशाच्या सिमेपलिकडे असलेल्या पाकिस्तानात काय झालंय?”, असा सवाल करीत भारतातील महाराष्ट्रातील राजकारणाची पाकिस्तानातील राजकारणाशी तुलना केली. म्हणजेच, सर्वोच्च न्यायालयाने, अजित पवार यांच्या वकिलांनी जे मुद्दे मांडले; त्यातून शरद पवार यांना पक्ष आणि चिन्ह मिळू न देता त्यांचा राजकीय अस्त करण्याचा अजित पवार यांचा कट उधळून लावला आहे. 

अपात्रतेच्या याचिका प्रलंबित असतानाच पक्षाबाबतचा  निर्णय आलाच कसा? असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने आगामी सात दिवसात शरद पवार यांना चिन्ह देण्याचे आदेश दिले. तसेच, जे नाव आहे तेच नाव प्रक्रिया सुरू असेपर्यंत कायम ठेवण्याचे आदेश दिले. पण, यामध्ये एक बाब खटकली; शरद पवारांकडून पक्ष काढून घेतले,  चिन्ह काढून घेतले.  सगळंच काढून घ्या.. आता कपडे काढून घ्यावे, इतके किळसवाणे राजकारण महाराष्ट्राचे करून ठेवले आहे.

ज्यांनी दिले त्याच सगळेच काढून घ्यायचे हे कसले राजकारण.

अजित पवार गटाला सुप्रीम कोर्टानं पाकिस्तानचा आरसा दाखवला! 

दुसरीकडे, अजित पवार गटाची बाजू मांडत असलेल्या मुकूल रोहतगी यांनी आक्षेप घेतल्यानंतर खंडपीठाने पाकिस्तानात सुरु असलेल्या  घटनेचा दाखला देत आरसा दाखवला. रोहतगी यांनी आक्षेप घेतल्यानंतर न्यायमूर्ती विश्वनाथन म्हणाले, “एखाद्या टप्प्यावर, मतदाराला काही सांगू द्या. त्यामुळे अराजकता निर्माण होईल. मला साधर्म्य द्यायचे नाही, परंतु तुम्ही सीमेपलीकडील (पाकिस्तानमधील सद्य राजकीय स्थिती) राजकारणाचे अनुसरण करत असाल तर संपूर्ण प्रकार घडला. कारण एखाद्याला बॅटचे चिन्ह हवे होते आणि ते दिले गेले नाही.” 

प्रकरणाची काय आहे पार्श्वभूमी?

शरद पवार यांनी दाखल केलेली याचिका, अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादीचे अधिकृत ‘घड्याळ’ चिन्ह देण्याच्या ECI च्या 6 फेब्रुवारीच्या निर्णयाच्या विरोधात आहे. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अजित पवार यांना राष्ट्रवादीचे नेते म्हणून मान्यता देण्याच्या ECI च्या आदेशाचा हवाला देऊन शरद पवार किंवा अजित पवार यांच्या गटातील आमदारांना अपात्र ठरवण्यास नकार दिला. गेल्या जुलैमध्ये अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीशी जुळवून घेतल्यामुळे पक्षांतर्गत सुरू असलेल्या मतभेदादरम्यान हा निर्णय घेण्यात आला, परिणामी अजित पवार यांची महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाली.

अजित पवार गटाने त्यानंतर राष्ट्रवादीचे अधिकृत चिन्ह मागितले, तर शरद पवार गटाने पक्षांतराचा आरोप करत अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांना घटनेच्या दहाव्या अनुसूचीनुसार अपात्र ठरवण्यासाठी याचिका केली. सुरुवातीला, सर्वोच्च न्यायालयाने अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय घेण्यासाठी स्पीकरसाठी 31 जानेवारीची अंतिम मुदत दिली होती, जी नंतर 15 फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली. या घडामोडींना प्रतिसाद म्हणून, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी गटाने सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट याचिका दाखल केली आणि निवडणूक आयोगाच्या घोषणेबाबत कोणत्याही निर्णयापूर्वी त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts