[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Weather Forecast : बिपरजॉय चक्रीवादळाची (Biparjoy Cyclone Update) तीव्रता वाधली आहे. बिपरजॉयने (Cyclone Biporjoy) अत्यंत तीव्र चक्रीवादळाच्या श्रेणीत प्रवेश केला आहे. चक्रीवादळाने मार्ग बदलल्यामुळे आता भारतालाही (India) धोका निर्माण झाला आहे. मार्ग बदलल्यानंतर आता बिपरजॉय चक्रीवादळ गुजरात (Gujrat) आणि पाकिस्तानच्या (Pakistan) किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. बिपरजॉय चक्रीवादळ 10 दिवस लांबण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. अरबी समुद्रातील चक्रीवादळे जास्त काळ टिकतात. त्यामुळे हे चक्रीवादळही अधिक काळ राहण्याची शक्यता आहे. अलिकडच्या काळात ग्लोबल वार्मिंगमुळे अरबी समुद्रावरील चक्रीवादळे वारंवार आणि अधिक तीव्र होत असल्याचं तज्ज्ञांच्या निदर्शनास आलं आहे.
भारतालाही बिपरजॉय चक्रीवादळाचा धोका
अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचं 10 दिवसानंतर 6 जून रोजी चक्रीवादळात रुपांतर झालं. हे चक्रीवादळ मोखा चक्रीवादळानंतरचं सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ असल्याचं बोललं जात आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, बिपरजॉय चक्रीवादळ कच्छच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. हे जास्त काळ टिकणारे चक्रीवादळ आहे. बिपरजॉय अलिकडच्या दशकात भारतावर प्रभाव टाकणारं आणि सर्वात दीर्घकाळ टिकणारं चक्रीवादळ ठरलं आहे.
Cyclone Alert for Saurashtra & Kutch Coast: Yellow Message. ESCS BIPARJOY over eastcentral Arabian Sea, at 2330 IST of 11th Jun near lat 18.9N & long 67.7E, Likely to cross between Mandvi (Gujarat) and Karachi (Pakistan) by noon of 15thJune. More details: https://t.co/EGetkpfaKk pic.twitter.com/ZUbomX4bPY
— India Meteorological Department (@Indiametdept) June 11, 2023
चक्रीवादळ कच्छच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता
बिपरजॉय चक्रीवादळ कच्छच्या किनारपट्टी धडकण्याची शक्यता असल्यामुळे या भागात धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. सौराष्ट्र आणि कच्छ किनारपट्टी भागात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मच्छीमारांनी समुद्रात जाण्यापासून मज्जाव करण्यात आला आहे. स्थानिक प्रशासन पूर्ण तयारीनिशी सज्ज झालं आहे. आवश्यक त्या उपाययोजना करण्याचं काम प्रशासनाकडून सुरु आहे.
सौराष्ट्र आणि कच्छ किनारपट्टी भागात येलो अलर्ट
भारतीय हवामान विभागाने ट्विट करत सांगितलं आहे की, ”चक्रीवादळामुळे सौराष्ट्र आणि कच्छ किनारपट्टीसाठी धोक्याचा इशारा : येलो अलर्ट. बिपरजॉय चक्रीवादळ पूर्व मध्य अरबी समुद्रावर 11 जूनच्या 2330 IST वाजता अक्षांश 18.9N आणि लांब 67.7E जवळ होतं. चक्रीवादळ 15 जूनच्या दुपारपर्यंत मांडवी (गुजरात) आणि कराची (पाकिस्तान) दरम्यान धडकण्याची शक्यता आहे.”
चक्रीवादळ मुंबईच्या समांतर पुढे सरकलं
बिपरजॉय चक्रीवादळ मुंबईच्या समांतर पुढे सरकलं आहे. गुजरातमधील कच्छ आणि सौराष्ट्राला चक्रीवादळाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. बिपरजॉय चक्रीवादळ मांडवी (गुजरात) आणि कराची (पाकिस्तान) दरम्यान ओलांडण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. बिपरजॉय चक्रीवादळ 15 जूनच्या दुपारी ताशी 125-135 किलोमीटर वाऱ्यांच्या वेगासह धडकणार असल्याची माहिती आहे. बिपारजॉय मांडवी ते कराची दरम्यान कुठे धडकणार अद्याप यासंदर्भात स्पष्टता नाही.
चक्रीवादळामुळे ‘हे’ सर्व जिल्हे प्रभावित होण्याची शक्यता
दरम्यान, चक्रीवादळामुळे 14 जून आणि 15 जून दरम्यान गुजरातमधील कच्छ, द्वारका, पोरबंदर, जामनगर राजकोट, जुनागड आणि मोरबी जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. चक्रीवादळामुळे हे सर्व जिल्हे प्रभावित होण्याची शक्यता आहे. जामनगर परिसरात अनेक तेल कंपन्यांच्या रिफायनरी, सोबतच कांडला पोर्ट देखील असल्याने चक्रीवादळामुळे मोठं आर्थिक नुकसान होण्याची भीती वर्तवण्यात आली आहे.
कोकण, मुंबई किनारपट्टी लगत वाऱ्यांचा वेग वाढणार
आज उत्तर कोकण आणि मुंबई किनारपट्टी लगत भागात वाऱ्यांचा वेग अधिक असणार आहे. सोबतच काही ठिकाणी पावसाची देखील शक्यता आहे. बिपरजॉय चक्रीवादळाचा लँडफॉल 15 जूननंतर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील 2 ते 3 दिवस गुजरात, राजस्थान आणि दिल्लीत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्याच्या किनारपट्टी भागात वादळी वाऱ्यासह पाऊस
महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर चक्रीवादळ धडकण्याचा धोका नाही, पण या चक्रीवादळाचा परिणाम दिसून येत आहे. राज्याच्या किनारपट्टी भागात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली. कोकण आणि गोवा किनारपट्टी भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. दरम्यान, वादळाच्या सावटाखालीच राज्यात रविवारी मान्सून दाखल झाला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
[ad_2]