Ashadhi Wari 2023 Sant Sadhu Maharaj Sansthan Dindi On Way To Kandahar From Pandharpur Maharashtra

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Sant Sadhu Maharaj Sansthan Dindi, Ashadhi Wari 2023 : संत साधू महाराज संस्थान (Sant Sadhu Maharaj Sansthan), कंधार यांची तब्बल 700 वर्षांपासून पायी दिंडी निघते. याहीवर्षी ही पंरपरा कायम ठेवत विठ्ठल भेटीसाठी कंधारहून (Kandhar) वारकरी पायी निघाले आहेत. दरम्यान, मराठवाड्यातून निघणाऱ्या दिंड्यांपैकी संत साधू महाराज संस्थान, कंधार यांची दिंडी मानाची समजली जाते. 

तब्बल सातशे वर्षांपासून पंढरपूरकडे पायी जाणारी दिंडी याहीवर्षी संस्थानचे सातवे वंशज मठाधिपती गुरुवर्य ह.भ.प. एकनाथ महाराज साधू आणि दिंडीचालक ज्ञानेश्वर महाराज साधू यांच्या नेतृत्वाखाली 11 जून 2023 रोजी कंधार येथून पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. कंधार शहरात बीआरएस (BRS) पक्षाकडून राजकुमार केकाटे यांनी आईस्क्रीम तर अनेक भाविकांकडून ठिकठिकाणी चहा, नाष्टा आणि अन्नदान करण्यात आलं. कंधार येथील संस्थानातर्फे 200 ते 250 वारकरी घेउन निघणारी ही दिंडी पंढरपुरात (Pandharpur Maharashtra) पोहोचते तेव्हा 25 हजार पर्यंत वारकरी या दिंडीसोबत जोडले जातात. 

मराठवाड्यातील पहिल्या क्रमांकाची दिंडी म्हणून संत साधू महाराज संस्थान, कंधार यांची दिंडी मानाची समजली जाते. कंधार ते पंढरपूर हे अंतर जवळपास 350 किमी आहे. सदर अंतर केवळ 15 दिवसांत पायी चालत कापलं जाते. दररोज दिंडीतील वारकरी 10 ते 15 किलोमीटर अंतर पार करतात. प्रत्येक दिवशी सुरू होणाऱ्या पायी प्रवासात वारकऱ्यांची चहा, पाणी, नाष्टा, जेवणाची व्यवस्था प्रवासा दरम्यान असलेल्या गावातील भक्तांतर्फे होते. दिंडी ज्या ठिकाणी मुक्काम करते त्या ठिकाणी, रात्रीचे भव्यदिव्य किर्तन होते. रात्रीचा आराम झाला की, पुढच्या प्रवासाला दिंडी मार्गस्थ होत असताना, त्या गावचे वारकरीही या दिंडीत सहभागी होतात आणि दिंडी पुन्हा विठुरायाच्या पंढरीच्या दिशेनं प्रस्थान करते.  

प्रत्येक वर्षी प्रमाणे यंदाही संस्थानचे सातवे वंशज मठाधिपती गुरुवर्य ह. भ. प. एकनाथ महाराज साधू यांच्या नेतृत्वाखाली दिंडी कंधार, लोहा,माळाकोळी, माळेगाव, सांगवी, अहमदपूर, शिरूर, चापोली, चाकुर, घरणी,भातखेडा, लातुर, साकरा, बोरगाव, मुरूड,ढवळाला, तडवळे, येडसी, घारी, जामगाव, बार्शी, म्हैसगाव, कुर्डूवाडी, कुर्मदास, आरण, आष्टी, आढीव, पंढरपूर अशी मार्गस्थ होणार आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Ashadhi wari 2023 : पुण्यातील पालखी मार्गावर महत्त्वाचे बदल, पाहा कोणते रस्ते सुरु, कोणते बंद? लाईव्ह लोकेशनची सुविधा…

[ad_2]

Related posts