SSC Syllabus : दहावीच्या अभ्यासक्रमाबाबत महत्त्वाची बातमी, नवा वाद निर्माण होण्याची शक्यता

( प्रगत भारत । pragatbharat.com) SSC Syllabus New Controversy : दहावीचा अभ्यासक्रम आता वादात अडकण्याची चिन्हे आहेत. कारण अभ्यासक्रमातून लोकशाहीचा धडा हद्दपार करण्यात आला आहे. लोकशाही आणि विविधता, चळवळी, राजकीय पक्ष, लोकशाहीसमोरची आव्हाने हे घटकही वगळण्यात आलेत. तसेच दहावीच्या सायन्सच्या पुस्तकातून आवर्तन सारणी म्हणजेच पिरियॉडीक टेबलही काढून टाकण्यात आले आहे. एनसीईआरटीने अभ्यासक्रम आणि पुस्तकांत बदल केलेत.  लोकशाहीचा धडा वगळल्याने मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच सायन्सच्या पुस्तकातून डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत वगळल्याने वाद पेटला होता. त्या पाठोपाठ आता हा नवा मुद्दा समोर आला आहे. याआधी अभ्यासक्रमातून मुघलांचा इतिहास, गुजरात…

Read More