इक्बाल कासकरच्या भावजीचा उत्तर प्रदेशात खून, दुसऱ्या पत्नीमुळे गेला जीव

( प्रगत भारत । pragatbharat.com) UP Crime News : उत्तर प्रदेशात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या जवळच्या नातेवाईकाची हत्या करण्यात आली आहे. भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी दाऊद इब्राहिमचा भाऊजी निहाल खान याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. पुतण्याच्या लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी उत्तर प्रदेशला आला असतानाच निहाल खानवर गोळ्या झाडण्यात आल्या. या हत्येमुळे उत्तर प्रदेशात खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशातील जलालाबादमध्ये दाऊद इब्राहिमच्या भाऊजीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. दाऊद इब्राहिमचा भाऊजीची त्याच्या पुतण्याच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये सहभागी होण्यासाठी जलालाबादला आला होता. मात्र त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. कार्यक्रमामध्ये…

Read More