टाकीचा नळ तुटला, तरुणाने केलेला भन्नाट जुगाड पाहून भारतातील प्रसिद्ध उद्योगपतीही भारावले, Video Viral

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video: भारतातील लोक आणि जुगाड याचा काही नेम नाही. देशात जुगाडू लोकांची कमतरता नाहीये. लोक असे काही भन्नाट उपाय शोधून काढतात की त्यांच्यापुढे भलेभले इंजिनिअर्स चाट पडतील. रोजच्या वापरातील वस्तू वापरुन मोठ्या मोठ्या गोष्टीही ठिक करतात. सोशल मीडियावर तर असे कित्येक व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंड होतोय. त्यातील व्यक्तीने केलेला जुगाड पाहून प्रसिद्ध उद्योगपतीही त्याचे कौतुक करण्यावाचून स्वतःला थांबवू शकले नाही. नक्की काय आहे का व्हिडिओ पाहूयात.  आरपीजी ग्रुपचे चेअरपर्सन हर्ष गोयंका यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.…

Read More