ओव्हरटेकच्या नादात गेला चौघांचा जीव; ट्रकने धडक दिल्याने कारमध्येच जिवंत जळाले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Saharanpur Accident : उत्तर प्रदेशच्या (UP News) सहारनपूर (Saharanpur) जिल्ह्यात बायपास हायवेवर एक मोठा अपघात झाला आहे. ट्रकने कारला धडक दिल्यामुळे काही क्षणात संपूर्ण वाहनाने पेट घेतला. आग इतकी भीषण होती की कारमध्ये बसलेल्या पती-पत्नीसह चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (UP Police) घटनास्थळ गाठून चौघांचेही मृतदेह ताब्यात घेतले आहेत. तसेच या अपघाताची माहिती मृतांच्या नातेवाईकांना देण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. रामपूर मणिहरन परिसरातील बायपास महामार्गावरील उड्डाणपुलावर हा अपघात झाला आहे. हरिद्वारहून येत असलेल्या अल्टो कारला…

Read More