भाऊबीजेला जुळून आलाय शुभ योग; यंदा औक्षणासाठीचा शुभ मुहूर्त कोणता? जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bhai Dooj 2023: दिवाळी एका आठवड्यावर येऊन ठेपली आहे. दिवाळीच्या दोन दिवसांनंतर देशभरात भाऊबीज साजरी केली जाते. भावा-बहिणीचे नाते हे खास असते. रक्षाबंधनप्रमाणेच भाऊबीजेलाही खास महत्त्व असते. या दिवशी भावाला ओवाळून त्याला टिळा लावणे याला अधिक महत्त्व असते. बहिण भावाच्या दीर्घआयुष्यासाठी प्रार्थना करते. ही प्रथा गेल्या कित्येक वर्षांपासून चालत आली आहे. पंचांग आणि शास्त्रीय नियमांनुसार भाऊबीज साजरा करण्याचा योग्य मुहूर्त, महत्त्व जाणून घेऊया.  भाऊबीज का साजरी केली जाते? पौराणिक मान्यतेनुसार, यमदेव एकदा आपली बहिण यमुनेच्या घरी भोजन करण्यासाठी गेले होत. यमुनेने यमराजाना प्रेमाने ओवाळले होते.…

Read More