“मी तुमच्या नेत्याला जाहीर आव्हान देतोय की…”, औवेसींनी राहुल गांधींना मैदानात खेचलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) एमआयएमचे खासदार आणि प्रमुख असदुद्दीन औवेसी यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना जाहीर आव्हान दिलं आहे. राहुल गांधी यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी वायनाड मतदारसंघाऐवजी हैदराबादमधील मतदारसंघातून निवडणूक लढवावी असं आव्हान असदुद्दीन औवेसी यांनी दिलं आहे. हैदरबादमधील आपल्या मतदारसंघात आयोजित सभेत ते बोलत होते. काँग्रेसची सत्ता असतानाच उत्तर प्रदेशच्या अयोध्येतील बाबरी मशीद उद्ध्वस्त करण्यात आली असंही यावेळी ते म्हणाले.  “मी तुमच्या नेत्याला (राहुल गांधी) आव्हान देतोय की, त्यांनी वायनाड नव्हे तर हैदराबादमधून निवडणूक लढवावी. तुम्ही नेहमी मोठी विधान करत असतात. पण मैदानात उतरुन माझ्याविरोधात लढा.…

Read More