सूर्याकडे यशस्वी वाटचाल! कुठपर्यंत पोहोचले आदित्य एल-1; इस्रोने दिली माहिती

( प्रगत भारत । pragatbharat.com) Aditya L1 Latest News: भारताची महत्त्वाकांक्षी सौर मोहिम आदित्य एल-१चे प्रक्षेपण शनिवारी २ सप्टेंबर रोजी श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरवरून करण्यात आले. आदित्य एल-1 हा उपग्रह सूर्याचा अभ्यास करणार आहे. आदित्य एल-1 च्या प्रक्षेपणानंतर रविवारी इस्रोने महत्त्वाची अपडेट दिली आहे. रविवारी आदित्य एल-१ने पृथ्वीची पहिली कक्षा बदलली आहे. तर, आता आदित्य एल-१ पृथ्वीची पहिला कक्षा बदलून दुसऱ्या कक्षेत प्रवेश केला आहे. आदित्य एल-1 हा उपग्रह 16 दिवस पृथ्वीच्या कक्षेत फिरणार आहे. त्यानंतर 110 दिवसांनंतर सूर्याकडे जाणारा त्याचा प्रवास सुरू होणार आहे.  आदित्य एल-1 या…

Read More