जहाजानं धडक देताच महाकाय पूल धाडकन कोसळला; हादरवणारा Video समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) US Francis Scott Key Bridge Collapse Video : जगभरात असणारे अनेक असे पूल आहेत जे कायमच सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले आहेत. अमेरिकेच्या मेरिलँड येथे असणारा फ्रान्सिस स्कॉट की ब्रिज हासुद्धा त्यातलाच एक. पुलाच्या भव्य आकारामुळं तो कायमच अनेकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला आहे. अशा या महाकाय पुलाचा एक मोठा भाग अपघातामुळं कोसळला असून, या पुलाचं बरंच नुकसान झालं आहे.  मेरिलँडमध्ये जहाजानं पुलाला धडक दिल्यामुळं एक प्रचंड अपघात झाला आणि पुलाचा बराच भाग पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणं पाण्यात कोसळला. अमेरिकेतील प्रमाण वेळेनुसार ही घटना रात्री दीड वाडम्याच्या सुमारास घडली.…

Read More