पहाटेच सुरक्षा दलाला मोठं यश; दोन तासातंंच ठार केले पाकिस्तानचे 5 दहशतवादी

( प्रगत भारत । pragatbharat.com) जम्मू-काश्मीरमधील कुपवाडामध्ये ( Kupwara) दहशतवाद्यांविरोधातील कारवाईत सुरक्षा दलाला मोठं यश मिळाले आहे. शुक्रवारी पहाटेपासूनच सुरू झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी 5 दहशतवाद्यांना (terrorists) ठार केले आहे. काश्मीरचे अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी (ADGP) ही माहिती दिली आहे. जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात शुक्रवारी पहाटे दहशतवादी आणि लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईमध्ये झालेल्या चकमकीत पाच पाकिस्तानी दहशतवादी ठार झाल्याची माहिती काश्मीर झोन पोलिसांनी दिली आहे. या भागात सध्या शोधकार्य सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Read More