( प्रगत भारत । pragatbharat.com) India-China Border Dispute: चीन पुन्हा एकदा भारताला डिवचण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. याचं कारण चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेववर स्थित अक्साई चीनमध्ये भूमिगत बांधकामं केली आहेत. चीनने अक्साई चीनमध्ये तटबंदी उभी केली असून, बंकर खोदले असल्याचं समोर आलं आहे. मॅक्सर या आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपनीच्या सॅटेलाईट फोटोंमधून हा खुलासा झाला आहे. या फोटोंमध्ये नदीशेजारी असणाऱ्या टेकडीवर सैन्यांसाठी तटबंदी आणि शस्त्रं ठेवण्यासाठी बंकर उभे केल्याचं दिसत आहे. अनेक विशेषज्ञांनी या फोटोंचं विश्लेषण केलं असून, त्यांच्या मते गेल्या अनेक महिन्यांपासून हे बांधकाम सुरु असल्याचं दिसत आहे. भारताच्या कथित…
Read More