महिला भूवैज्ञानिकाची घरात घुसून हत्या, भावाच्या फोनमुळे झाला उलघडा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : कर्नाटकची (Karnataka Crime) राजधानी बंगळुरुमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बंगळुरूमध्ये वरिष्ठ भूवैज्ञानिक म्हणून काम करणाऱ्या महिलेची तिच्या राहत्या घरी हत्या करण्यात आली. बंगळुरूमध्ये एका महिला भूवैज्ञानिकाची गळा चिरून हत्या केल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना शनिवारी रात्री घडल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी (Karnataka Police) दिलेल्या माहितीनुसार, गळा आवळून व गळा चिरल्याने मृत्यू झाला आहे. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. भावाचा फोन न उचलल्याने झाला खुलासा एस. प्रतिमा असे 43 वर्षीय मृत महिलेचे…

Read More