पत्नीसोबत निघालेल्या बाईकस्वारावर काळ होऊन कोसळली बाल्कनी; मृत्यूचा थरार CCTVत कैद

( प्रगत भारत । pragatbharat.com) Accident News : हरियाणाच्या (haryana) पानिपत (panipat) शहरात गुरुवारी एक मोठा अपघात घडला आहे. बाल्कनी अंगावर कोसळल्याने (wall collapse on biker) एका बाईकस्वाराचा जागेवरच मृत्यू झाला आहे. या अपघातात मृत व्यक्तीची पत्नी थोडक्यात बचावली आहे. पानिपत येथील पचरंगा बाजार येथे बाईकवरून जात असताना 80 वर्षांच्या जीर्ण घराची बाल्कनी पडल्याने या व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला. बाल्कनीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत एका स्थानिकाचा पायही तुटला. पाचरंगा मार्केटमधील जीर्ण इमारतीचे बांधकाम सुरू असताना ही घटना घडली. यावेळी दुचाकीवरून जात असलेल्या दाम्पत्याच्या अंगावर विटांसह…

Read More