[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
कॅल्शियमच्या कमतरेतमुळे होतात हे आजार
कॅल्शियमच्या कमतरतेमुळे ब्लड प्रेशर, हाडे आणि स्नायू आखडणे, दातदुखी, कोरडी त्वचा, नखे कमकुवत असणे तसेच सतत नखे तुटणे यासारख्या समस्या जाणवतात. तसेच कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हृदय रोग होण्याची देखील शक्यता असते. कॅल्शियमच्या कमतरेतमुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका अधिक वाढतो.
कॅल्शियम का महत्वाचं
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ ऑफिस ऑफ डायटरी सप्लिमेंट्सच्या आकडेवारीनुसार, प्रौढांना दररोज किमान एक हजार मिलीग्राम कॅल्शियम वापरण्याचा सल्ला दिला जातो. वय आणि लिंगानुसार नियमित थोडे बदल करणे गरजेचे आहे. महिलांना पुरूषांपेक्षा जास्त कॅल्शियमची गरज असते.
अंजीर
अंजीरमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते जवळपास २४१ मिलीग्रॅम या सुक्यामेव्यात असते. तसेच फायबर्स आणि एँटीऑक्सिंडंट्स आणि आयर्न देखील यामध्ये मोठ्या प्रमाणात असते.
सोया दूध
कपभर फोर्टिफाइड सोया मिल्कमध्ये गायीच्या दुधाइतकेच कॅल्शियम असते. तसेच व्हिटॅमिन डी आणि लॅक्टोजयुक्त दुधापेक्षा यामध्ये कमी चरबी असते. त्यामुळे वजन वाढणार नाही.
चिया सिड्स
चिया सिड्स वजन कमी करण्यासोबतच शरीरातील कॅल्शियम भरून काढण्यास मदत करते. २ चमचे चिया सिड्समध्ये १७९ मिलीग्रॅम कॅल्शियम असते. यामुळे हाडांचे आरोग्य चांगले राहते.
बदामाचे दूध
बदाम हे शरीरातील फायदेशीरच असते. पण बदामाच्या दुधाने शरीरात मोठ्या प्रमाणात कॅल्शियम मिळते. बदामामध्ये ३८५ मिलिग्रॅम कॅल्शियम असते. तर ८३८ कॅलरीज आणि ७२ ग्रॅम चरबी असते.
किव्ही
किव्ही या फळात मोठ्या प्रमाणात कॅल्शियम आहे. दररोज या फळाचे सेवन केल्यास नैसर्गिकरित्या कॅल्शियमची कमतरता पूर्ण होते. एनसीबीआयने प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार ६०० मिलीग्रॅम कॅल्शियम असते. याचे तुम्ही ज्यूस देखील घेऊ शकता.
संत्री आणि अननस
संत्री आणि अननस मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते. एआयएचच्या रिपोर्टनुसार व्हिटॅमिन सीने समृद्ध असलेल्या संत्री आणि अननसामध्ये कॅल्शियमचे उत्तम स्त्रोत आहे. हाडे आणि दात मजबूत होण्यास हे फळ महत्वाचं आहे.
बेरीज
फळांमध्ये जांभूळ, ब्लॅकबेरी आणि स्ट्रॉबेरीमध्ये मोठ्या प्रमाणाक कॅल्शियम असते. अशावेळी तुम्ही इतर पदार्थांसोबत या फळांचा देखील समावेश करू शकता.
भेंडी
भेंडीची भाजी प्रत्येकालाच आवडते असे नाही. पण भाज्यांमध्ये भेंडीमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम उपलब्ध आहे. भेंडीमध्ये जवळपास ६५ मिलीग्रॅम कॅल्शियमची आवश्यकता असते.
केल आणि ब्रोकोली
भाज्यांमध्ये केल आणि ब्रोकोली या इंग्रजी भाज्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते. १ कप केलमध्ये १७७ मिलीग्रॅम कॅल्शियम आहे तर कच्च्या केलमध्ये ५३ मिलीग्रॅम कॅल्शियम असते.
टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.
[ad_2]