( प्रगत भारत । pragatbharat.com)
Lakshmi Narayan Yoga : अधिक मासातील आज सर्वात शुभ योग जुळून आला आहे. अधिक मास हा लक्ष्मी नारायणला समर्पित आहे. त्यात आज पहाटे ग्रहांचा राजकुमार बुधाने सिंह राशीत प्रवेश केला आहे. 19 वर्षांनंतर अधिक मासात बुध गोचरमुळे (Budh Gochar 2023) लक्ष्मी नारायण राजयोग (Lakshmi Narayan Yoga) जुळून आला आहे.
सिंह राशीत शुक्र ग्रह आधीच विराजमान असून अधिक मासात शुक्र बुध युती (Shukra Budh Yuti) झाली आहे. ही युती 7 ऑगस्टपर्यंत राहणार असल्याने सिंह राशीत लक्ष्मी नारायण योग 14 दिवस असणार आहे. चला जाणून घेऊयात कोणाला लागणार लॉटरी तर कोणावर कोसळणार आर्थिक संकट…(budh gochar Create Lakshmi Narayan Yoga lucky and unlucky zodiac signs today 25 july horoscope)
‘या’ राशींना होणार धनलाभ
मिथुन (Gemini)
बुध गोचरमुळे तयार झालेला लक्ष्मी नारायण राजयोग मिथुन राशीसाठी भाग्यशाली ठरणार आहे. बुध हा मिथुन राशीचा स्वामी आहे. त्यामुळे हा राजयोग मिथुन राशीसाठी वरदान ठरणार आहे. लांब पल्लाचा प्रवासाचे योग आहेत.
सिंह (Leo)
सिंह राशीमध्येच लक्ष्मी नारायण योग तयार होत असल्याने सर्वाधिक धनलाभ होणार आहे. प्रत्येक कामात यश मिळणार आहे. या 14 दिवसात तुम्हाला अचानक आर्थिक फायदा होणार आहे.
तूळ (Libra)
बुध गोचरमुळे तूळ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती भक्कम होणार आहे. पैशाचं संकट दूर होणार आहे. व्यावसायिक लोकांना प्रवास करावा लागणार आहे. त्यातून तुमचा फायदा होणार आहे. गुंतवणुकीसाठी चांगला काळ आहे.
कुंभ (Aquarius)
कुंभ राशीच्या लोकांसाठी लक्ष्मी नारायण योग फलदायी ठरणार आहे. या 14 दिवसात तुमचे नातेसंबंध घट्ट होणार आहे. वैवाहिक जीवनात सुख शांती असणार आहे. आर्थिक बाजू भक्कम होणार आहे.
वृश्चिक (Scorpio)
वृश्चिक राशीचे लोकांसाठी हा राजयोग नशिबाची साथ देणारा ठरणार आहे. प्रगतीचे उंच शिखर तुम्ही गाठणार आहे. करिअरमध्ये यश आणि प्रगती प्राप्त होणार आहे. बेरोजगारांना नोकरीची संधी मिळणार आहे. बिझनेस करणाऱ्यासाठी फलदायी काळ असणार आहे.
‘या’ राशींना बसेल आर्थिक फटका!
मेष (Aries)
या राशीच्या लोकांना बुध गोचरमुळे संकटाचा सामना करावा लागणार आहे. मुलांच्या भविष्याची चिंता तुम्हाला सतावणार आहे. उत्पन्नापेक्षा जास्त खर्च होणार आहे. पैशाशी संबंधित समस्या निर्माण होणार आहे. आरोग्याकडे लक्ष द्या.
वृषभ (Taurus)
बुध गोचरमुळे या राशीच्या लोकांना कुटुंबात वादावादी घडण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थितीही गडबडणार आहे. व्यवसायातही तोटा होणार आहे. कुठलंही काम करण्यापूर्वी शंभर वेळा विचार करा.
कर्क (Cancer)
कर्क राशीच्या लोकांसाठी पुढील काळ कठीण असणार आहे. कार्यक्षेत्रात कामाचा ताण वाढणार आहे. महत्त्वाची कामं करताना संयम पाळा. व्यवसायात तोटा होण्याची शक्यता आहे. कुटुंबातही तणाव असणार आहे.
कन्या (Virgo)
या राशीच्या लोकांसमोर अनेक अडचणी उभा राहणार आहेत. कार्यक्षेत्रात कामांमध्ये अडथळे येणार आहेत. तुम्हाला आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. प्रवासातून नुकसान होण्याची चिन्हं आहेत. या काळात कुठलेही मोठे निर्णय घेऊ नका.