NASA Warns Solar Storm Can Destroy Earth In Just 30 Minutes Know How Earth Ends; फक्त ३० मिनिटांत पृथ्वीचा होणार विनाश, जीव वाचवणंही कठीण; नासाच्या दाव्याने खळबळ

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : लवकरच जगाचा नाश होणार आहे, जग संपणार आहे, अशा अफवा नेहमीच पसरत असतात. कधी उल्कापिंडाच्या धडकेने तर कधी त्सुनामीमुळे पृथ्वी बुडेल अशा अनेक बातम्या आणि दावे गेल्या काही दिवसांत आपण पाहिले असतील. सोशल मीडियावर अनेकजण स्वत:ला टाईम ट्रॅव्हलर्स म्हणवून भविष्यवाणी करत असतात. पण आता नासानेच असा इशारा दिल्यामुळे लोकांची धडधड वाढली आहे.अवकाशात होणाऱ्या हालचालींवर नासा बारकारईने लक्ष ठेवत असतं. कोणात ग्रह फिरतोय, कोणते खडक पृथ्वीच्या जवळ असतात, या सगळ्यांवर नासा लक्ष ठेवून आहे. नासाने वेळोवेळी तसे इशारेही दिले आहे. अशात नासाने केलेल्या नवीन घोषणेमुळे संपूर्ण जगात एकच खळबळ उडाली असून नासाने यासंबंधी खुलासाही केला आहे.

Weather Alert: महाराष्ट्रात उष्णतेची लाट, मोचा चक्रीवादळाचा परिणाम; मुंबईसह ‘या’ शहरांना अलर्ट
जेव्हा पृथ्वीवर मोठं वादळ किंवा प्रलय येईल तेव्हा लोकांकडे फक्त अर्धा तास असणार आहे. या अर्ध्या तासामध्येच त्यांना आपला जीव वाचवावा लागेल, असं नासाचं म्हणणं आहे. यावेळी गोष्टी इतक्या वेगाने होतील की आपली कुठलीही सुरक्षा यंत्रणा तेव्हा उपयोगी ठरणार नाही.

पृथ्वीवर मोठं आस्मानी संकट….

नासाच्या शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, अवकाशातून होणारा विध्वंस हे पृथ्वीच्या शेवटाचं कारण ठरणार आहे. त्यांच्या मते अंतराळामध्ये एक मोठं वादळ येईल आणि त्यामध्ये संपूर्ण पृथ्वी नष्ट होईल. या सौर वादळामुळे पृथ्वीवर मोठ्या ज्वाळा उठतील. त्या इतक्या तीव्र आणि मोठ्या असतील की त्यामध्ये तुम्ही हवाई मार्गानेही सुरक्षित राहू शकणार नाही. या वादळाला पृथ्वीवर पोहोचण्यासाठी फक्त अर्धा तास लागेल. म्हणजेच इतक्या कमी वेळात पृथ्वीचा नाश होईल, असं नासाचं म्हणणं आहे.

Pune Video: कारवाईसाठी अधिकारी येताच फेरीवाल्यांकडून जीवघेणा हल्ला, धक्कादायक दृश्य कॅमेऱ्यात कैद

AI मॉडेलची मदत घेणार…

स्पेस एजन्सी AI म्हणजेच आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या मदतीने या विनाशाबद्दल माहिती गोळा करत आहे. याद्वारे ते अशी यंत्रणा विकसित करत आहेत, ज्यामुळे वादळ येण्याआधी त्याची माहिती पृथ्वीवर मिळेल. यासाठी अनेक उपग्रह कामाला लावले असल्याचीही माहिती आहे. पण वादळ आल्यानंतर उपग्रह सिग्नल देण्याचं बंद करत असल्याचं आतापर्यंतच्या अभ्यासात समोर आल आहे. त्यामुळे AI च्या मदतीने यावर काम सुरू आहे.

[ad_2]

Related posts