तिसऱ्या तिमाहीचा GDP आज जाहीर होणार,  6.9 टक्के GDP राहण्याचा अंदाज

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)
GDP Q3 Deta : आर्थिक वर्ष 2023-24 च्या तिसऱ्या तिमाहीचे GDP चे आकडे आज (29 फेब्रुवारी 2024) जाहीर केले जाणार आहेत. ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत आर्थिक विकास दर 6.7 ते 6.9 टक्के असण्याचा अंदाज आहे. जो दुसऱ्या तिमाहीतील 7.6 टक्के GDP वाढीच्या दरापेक्षा कमी आहे. कृषी क्षेत्राच्या खराब कामगिरीमुळं जीडीपी वाढीचा दर कमी राहण्याची अपेक्षा आहे.

दुसऱ्या तिमाहीत GDP वाढीचा वेग अधिक होता

एसबीआय रिसर्चने एक अहवाल प्रसिद्ध केला असून, त्यात हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. SBI ने आर्थिक वर्ष 2023-24 च्या तिसऱ्या तिमाहीतील GDP वाढीचा अधिकृत डेटा जाहीर होण्याच्या एक दिवस आधी हा अंदाज वर्तवला आहे. तर दुसऱ्या तिमाहीत, उत्पादन क्षेत्रातील मजबूत तेजीमुळं, जीडीपी वाढीचा दर 7.6 टक्के अपेक्षेपेक्षा खूप जास्त होता. या आकडेवारीसह भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारा आर्थिक देश बनला आहे. आर्थिक विकासात वाढ होण्याचे कारण म्हणजे उत्पादनाच्या वाढीसह सरकारी खर्चात झालेली वाढ आहे. तिसऱ्या तिमाहीत  GDP 6.7 ते 6.9 टक्के वाढीचा अंदाज आहे. SBI रिसर्चचा अंदाज भारतीय रिझर्व्ह बँकेच्या 7 टक्के वाढीच्या अंदाजापेक्षा कमी आहे. SBI रिसर्चने चौथ्या तिमाहीत 6.8 टक्के वाढीचा अंदाज वर्तवला आहे. एसबीआय रिसर्चने म्हटले आहे की ऑक्टोबर-डिसेंबर 2023 तिमाहीत विकास दरातील अंदाजे घसरणीचे सर्वात मोठे कारण म्हणजे कृषी क्षेत्राची खराब कामगिरी.

आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये देशाची अर्थव्यवस्था 7.3 टक्के दराने वाढेल, असा अंदाज केंद्रीय सांख्यिकी कार्यालय (CSO) च्या वार्षिक GDP वाढीच्या पहिल्या आगाऊ अंदाजानुसार व्यक्त करण्यात आला होता. यापूर्वी 2022-23 या आर्थिक वर्षात जीडीपी 7.2 टक्के होता. केंद्रीय सांख्यिकी कार्यालयानं जीडीपीचा आगाऊ अंदाज डेटा जारी करताना सांगितले की, देशाचा जीडीपी 2023-24 मध्ये 171.79 लाख कोटी रुपये असू शकतो, जो 2022-23 मध्ये 160.66 लाख कोटी रुपये होता.

2024 मध्ये भारताचा विकासदर किती राहणार?

2024 मध्ये भारताचा विकास दर 6.5 टक्के असेल असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटले आहे. IMF ने आपल्या अंदाजात 20 बेसिस पॉइंट्सने सुधारणा केली आहे. 2025 मध्येही भारताचा जीडीपी 6.5 टक्के असू शकतो असा अंदाज IMF ने व्यक्त केला आहे. हे 2023 च्या 6.7 टक्के अंदाजापेक्षा कमी आहे. तर भारत सरकारचा स्वतःचा अंदाज 7.3 टक्के आहे.

महत्वाच्या बातम्या:

[ad_2]

Related posts