mp road accident in dindori 14 people died after pickup vehicle overturned

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Madhya Pradesh Dindori Accident : मध्य प्रदेशमधील डिंडोरी जिल्ह्यात झालेल्या भीषण अपघातामध्ये 14 जणांचा जागीच मृत्यू जालाय. तर 21 जण जखमी असल्याचं समजतेय. यामधील अनेकांची प्रकृती अतिशय गंभीर असल्याचं सांगितलं जातेय. बडझर घाटात पिकअपचा भीषण अपघात झाल्याचं सजतेय. डिंडोरीचे जिल्हाधिकारी विकास मिश्रा (Vikas Mishra, Dindori Collector) यांनी या वृत्ताला दुजोरा दिलाय. त्याशिवाय जखमीवर शाहपुरा कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये उपचार सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं. 

मिळालेल्या माहितीनुसार, पिकअप चालकाचं बडझर घाटात नियंत्रण सुटलं. त्यामुळे घाटात पिकअप वाहन पलटी झालं. त्यामुळे 14 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 21 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल कऱण्यात आलेय. डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमानंतर घराकडे परत येत असताना पिकअपचा अपघात झाला. घाटामध्ये चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे भीषण अपघात घडला. या अपघातामधील जखमीवर शाहपुरा सार्वजनिक आरोग्यय केंद्रामध्ये सुरु आहेत. जखमी झालेल्या काही प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समोर आलेय. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली, त्याशिवाय स्थिनिकांनीही तात्काळ मदत केली.

पोलिसांनी सर्व मृ प्रवाशांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. सर्व जखमी प्रवाशांवर उपचार सुरु आहे. अपघामधील सर्वजण देवरी गावातील असल्याची माहिती मिळाली आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी या अपघाताबद्दल शोक व्यक्त केलाय. त्याशिवाय तात्काळ मदत जाहीर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्याशिवाय मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी चार चार लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts