Pm Narendra Modi Will Hand Over Appointment Letters Of Government Jobs To 70 Thousand Youth Know Details

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Employment Fair: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज, मंगळवारी (13 जून) देशातील 70 हजार तरुणांना सरकारी नोकऱ्यांची नियुक्तीपत्रे वितरित करणार आहेत. रोजगार मेळा उपक्रमांतर्गत या भेटींचं वितरण करण्यात येत आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये पीएम मोदींनी यासंदर्भात घोषणा केली होती. पुढील दीड वर्षात मिशन मोडमध्ये 10 लाख लोकांना सरकारी नोकऱ्या देण्यात येतील, असं त्यावेळी मोदींनी सांगितलं होतं. त्यानुसार आज ते देशातील तब्बल 70 हजार तरुणांना नोकऱ्यांची नियुक्तीपत्रे वितरित करणार आहेत. 

केंद्र सरकारच्या रोजगार मेळाव्याअंतर्गत मंगळवारी (13 जून) देशभरात 43 ठिकाणी रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. या रोजगार मेळाव्याअंतर्गत पंतप्रधान मोदी 70 हजार तरुणांना त्यांच्या नोकरीसाठी नियुक्ती पत्रांचं वाटप करणार आहेत. सकाळी 10.30 वाजता, पंतप्रधान व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे रोजगार मेळाव्याच्या या कार्यक्रमात सहभागी होतील आणि नवनियुक्त कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रं सुपूर्द करतील. तसेच, या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी तरुणांना संबोधितही करणार आहेत. 

विविध विभागांमध्ये भरती

रोजगार मेळाव्याअंतर्गत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसह केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये भरती केली जात आहे. वित्तीय सेवा विभाग, पोस्ट विभाग, शालेय शिक्षण विभाग, उच्च शिक्षण विभाग, संरक्षण मंत्रालय, महसूल विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, गृह मंत्रालय यासह अनेक विभागांमध्ये नवीन भरती करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी आज या तरुणांना त्यांची नियुक्तीपत्रे सुपूर्द करणार आहेत.

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सुरू झालेली मोहीम 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या वर्षी 22 ऑक्टोबर रोजी सुमारे 10 लाख तरुणांना सरकारी नोकऱ्या देण्यासाठी मोहीम सुरू केली होती. आतापर्यंत अनेक टप्प्यांत तरुणांना सरकारी नोकऱ्यांसाठी नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकार ही मोहीम पूर्ण करेल आणि निवडणुकीतील आपल्या अजेंड्यामध्ये ठामपणे मुद्दा मांडेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

IGOT कर्मयोगी पोर्टलवर नवनियुक्त तरुणांचं प्रशिक्षण 

केंद्र सरकारच्या विभागांव्यतिरिक्त राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशातील विविध विभाग आणि संस्थांमध्ये रोजगार मेळाव्याअंतर्गत भरती केली जात आहे. ज्यासाठी देशभरातून नवनियुक्त कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. रोजगार मेळावा हे पंतप्रधान मोदींचे रोजगार वाढविण्यास प्राधान्य देण्याच्या दिशेनं एक मोठं पाऊल असल्याचं बोललं जात आहे. 

नवनियुक्त सरकारी कर्मचार्‍यांना IGOT कर्मयोगी पोर्टलवर ‘कर्मयोगी प्रारंभ’ या ऑनलाईन मॉड्यूलद्वारे स्वतःला प्रशिक्षण देण्याची संधी देखील मिळेल. या पोर्टलवर 400 हून अधिक ई-लर्निंग अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत. कर्मचारी देशाच्या कोणत्याही भागातून आणि कोणत्याही उपकरणाद्वारे या पोर्टलशी कनेक्ट करू शकतात. 

दरम्यान, मोदी सरकारला गेल्या महिन्यात 9 वर्ष पूर्ण झाली आहेत. या वर्षांत विरोधी पक्षांनी रोजगाराच्या मुद्द्यावर मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे, भाजप नेत्यांचा विश्वास आहे की, 10 लाख नोकऱ्यांचं वाटप केल्यानंतर ते विरोधकांच्या आरोपांना ठामपणे उत्तर देण्यास सक्षम होतील. 



[ad_2]

Related posts