Mahashivratri 2024 visit this temples of shiva during mahashivratri know where are 12 jyotirlingas of shiva situated all main shankar mahadev temples in india

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Mahashivratri 2024 : यंदा शुक्रवारी, 8 मार्चला महाशिवरात्रीचा (Mahashivratri) उत्सव साजरा केला जाणार आहे. फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री हा सण साजरा केला जातो. हिंदू धर्मात महाशिवरात्रीला विशेष महत्त्व आहे. महादेवाची विशेष कृपा मिळवण्यासाठी महाशिवरात्रीचा उपवास केला जातो आणि महादेवाची पूजा केली जाते. जीवनातील सर्व दुःख, अडचणी, आर्थिक समस्या दूर करण्यासाठी शिवशंकराची भक्तिभावाने उपासना केली जाते.

यंदाच्या महाशिवरात्रीला तुम्ही शंकराच्या प्राचीन मंदिराला किंवा एखाद्या ज्योतिर्लिंगाला भेट देऊ शकता. आता ही शिवशंकराची 12 ज्योतिर्लिंगं नेमकी कुठे आहेत? जाणून घेऊया. प्रथम महाराष्ट्रात वसलेल्या ज्योतिर्लिंगांवर नजर टाकूया.

1. भीमाशंकर ज्योतिर्लिंग, पुणे (Bhimashankar Jyotirlinga in Maharashtra)

12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेलं श्रीक्षेत्र म्हणजे भीमाशंकर.पुणे जिल्यातील खेड तालुक्यात भीमाशंकर असून या ज्योतिर्लिंगामधून महाराष्ट्रातील मुख्य नद्यांपैकी एक भीमा नदी उगम पावते. हे ज्योतिर्लिंग पर्यटनस्थळ म्हणून अधिक नावारूपाला आलं आहे. जो कोणी भक्त सूर्योदयानंतर या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतो त्याची सर्व पापं नष्ट होतात, असं म्हटलं जातं.

2. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग, नाशिक (Trimbakeshwar Jyotirlinga in Nashik)

त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात आहे. गोदावरी नदीचं उगम स्थान असणाऱ्या ब्रम्हगिरी पर्वताच्या पायथ्याशी त्र्यंबकेश्वर वसलं आहे. भगवान शिवाचं एक नाव त्र्यंबकेश्वर आहे, जो कोणी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात दर्शन घेतो त्याला मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो, अशी मान्यता आहे.

3. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग, औरंगाबाद (Ghrishneshwar Jyotirlinga in Aurangabad)

घृष्णेश्वर मंदिर हे एक प्राचीन शंकराचं मंदिर आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणून प्रसिद्ध असणारं हे मंदिर महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात असून दौलताबाद स्टेशनपासून ते साधारण 11  किमी अंतरावर आणि वेरूळ लेण्यांजवळ आहे. महाशिवरात्रीला घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतल्यास अपत्यप्राप्तीची मनोकामना लवकर पूर्ण होते, अशी मान्यता आहे.

4. सोमनाथ ज्योतिर्लिंग, गुजरात (Somnath Jyotirlinga in Gujarat)

सोमनाथ ज्योतिर्लिंग गुजरातमध्ये आहे. भगवान सोमनाथाची पूजा-अर्चा केल्याने भक्तांची मागील जन्मातील सर्व पापं नष्ट होतात आणि भगवान शंकर त्यांच्यावर सदैव आपला आशीर्वाद ठेवतात, असं म्हटलं जातं.

5. वैद्यनाथ ज्योतिर्लिंग, झारखंड (Baidyanath Jyotirlinga in Jharkhand)

झारखंडमधील देवघर नावाच्या ठिकाणी वैद्यनाथ मंदिर आहे. शंकराचं दुसरं नाव ‘वैद्यनाथ’ देखील आहे. श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचं दर्शन आणि पूजा केल्याने रोगांपासून मुक्ती मिळते, अशी मान्यता आहे.

6. श्री मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग, आंध्र प्रदेश (Mallikarjuna Jyotirlinga in Andhra Pradesh)

श्री मल्लिकार्जुन हे आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यात आहे, या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाने सर्व पापांचा नाश होतो आणि पूजा केल्याने अश्वमेध यज्ञासारखे पुण्य प्राप्त होतं, असा समज आहे.

7. महाकालेश्वर ज्योतिर्लिंग, मध्य प्रदेश (Mahakaleshwar Jyotirlinga in Madhya Pradesh)

महाकालेश्वर हे  ज्योतिर्लिंग मध्य प्रदेशातील उज्जैन येथे वसलेलं आहे. महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाने अकाली मृत्यूची भीती दूर होते, असं समजलं जातं.

8. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग, मध्य प्रदेश (Omkareshwar Jyotirlinga in Madhya Pradesh)

ओंकारेश्वर हे ठिकाण मध्य प्रदेशातील खांडवा भागात नर्मदा नदीच्या मध्यभागी असलेल्या एका बेटावर आहे. ओंकारेश्वर लिंगाला स्वयंपूर्ण मानलं जातं. हे ज्योतिर्लिंग ओंकार म्हणजेच ओमच्या आकारात आहे.

9. केदारनाथ ज्योतिर्लिंग, उत्तराखंड (Kedarnath Jyotirlinga in Uttarakhand)

केदारनाथ हिमालयातील केदार नावाच्या पर्वतावर हे ज्योतिर्लिंग वसलेलं आहे. जे भक्त महाशिवरात्रीला भोलेनाथांच्या दर्शनासाठी केदारनाथ धामला पोहोचतात, त्यांना महादेव सर्व पापांपासून मुक्त करतात, असं म्हटलं जातं.

10. काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग, उत्तर प्रदेश (Kashi Vishwanath Jyotirlinga Uttar Pradesh)

वाराणसी येथे स्थित काशी विश्वनाथजी हे प्रमुख ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे, या मंदिरात असलेल्या शिवलिंगाचं दर्शन घेतल्यावर भक्ताला शाश्वत पुण्य प्राप्त होते, अशी मान्यता आहे.

11. नागेश्वर ज्योतिर्लिंग, गुजरात (Nageshwar Jyotirlinga in Gujarat)

श्री नागेश्वर ज्योतिर्लिंग हे गुजरातमधील बडोदा भागात द्वारकाजवळ स्थित आहे. नागेश्वर ज्योतिर्लिंगाची पूजा केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.

12. रामेश्वर ज्योतिर्लिंग (Rameshwar Jyotirlinga, Tamil Nadu)

श्री रामेश्वर तीर्थ तामिळनाडूच्या रामनाद जिल्ह्यात आहे. महाशिवरात्रीला या शिवलिंगाचं दर्शन घेतल्याने सर्व रोगांपासून मुक्ती मिळते, अशी मान्यता आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

March Festivals Calendar 2024 : मार्च महिना धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा; महाशिवरात्री ते होळीपर्यंत… महिनाभरातील सर्व सणांची-व्रतांची यादी पाहा

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts